AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येत भाजप पडली, तिथेही मीच पाडलं का?, अब्दुल सत्तार यांचा रावसाहेब दानवेंना खोचक टोला

मी एकनाथ शिंदे यांचा विश्वासू कार्यकर्ता आहे. त्यांचा विश्वास आहे तो पर्यंत भाजप-शिवसेनेसोबत आहे. मी 18-18 तास काम करतो. माझी हद्द जनता जनार्दन आहे. मुख्यमंत्री म्हणतील तो पालकमंत्री होईल. इच्छा कुणाची नसते? मात्र मुख्यमंत्री सांगतील ते होईल. पालकमंत्री हा शिवसेनेचा राहील. त्याबाबत भाजपला चर्चा आणि दावा करण्याचीही गरज नाही. इथे आमचे एक खासदार आणि 5 आमदार आहेत, असं मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

अयोध्येत भाजप पडली, तिथेही मीच पाडलं का?, अब्दुल सत्तार यांचा रावसाहेब दानवेंना खोचक टोला
abdul sattarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 14, 2024 | 6:07 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत महायुतीचे, त्यातही खासकरून भाजपचे दिग्गज नेते पराभूत झाले. रावसाहेब दानवे यांनाही यावेळी घरी बसावं लागलं. दानवे यांचा पराभव शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोपांना अब्दुल सत्तार यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांना मी पाडलं म्हणता. अयोध्येत भाजप पडली. तिथेही मीच पाडलं का?, असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. रावसाहेब दानवे यांना योग्य वेळात उत्तर दिलं जाईल. त्यांना 25 वर्ष मतदारांनी इथून लीड दिली आहे. माझ्यावर बेछूट आरोप करताना विचार केला पाहिजे. अयोध्येत भाजप पडली तिथे मी पाडलं का? दानवे यांच्या मतदासंघात सर्वाधिक सभा मी घेतल्या आहेत. आरोप करून समाधान वाटत असे तर त्यांनी खुशाल आरोप करावेत. मी एवढा मोठा नाही की खासदार पडेल. मात्र लोक समजतात. आपला पराभव का झाला? याचा विचार रावसाहेब दानवे यांनी करावा, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला.

टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला बोलावणार

रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला तर टोपी काढेल असं मी 2014मध्ये म्हटलो होतो. त्यानंतर मी त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणलं. आता त्यांना टोपी काढण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार आहे, असं सत्तार म्हणाले.

झिरो बजेट लोकांची चर्चा करावी का?

अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना पाडल्याने त्यांना मंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी भाजपमधून होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. झिरो बजेट लोकांची चर्चा तुम्ही करावी का? खडकू लोक आहेतही. मी त्यांची चर्चा करणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

कुत्रा निशाणीवरही निवडून येऊ शकतो

आमच्या मतदारसंघातील गावं आणि तांड्यावर मी सतत फिरत असतो. तुम्ही मतदारसंघात कुणालाही विचारू शकता. मी काही रेडिमेड पुढारी नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेला पुढारी नाही. मी कुत्रा निशाणीवरही निवडून येऊ शकतो, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.