AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | लसीकरण वाढवण्याच्या बैठकीला आमदार-खासदारांचीच दांडी, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा पुढचा प्लॅन काय?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत टास्क फोर्सच्या वेळोवेळी बैठका झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नही केले गेले. मात्र लसीकरण वाढले नाही. याचे खापर लोकप्रतिनिधींनी प्रशासनावरच फोडले. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात असून लसीकरण वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

Aurangabad | लसीकरण वाढवण्याच्या बैठकीला आमदार-खासदारांचीच दांडी, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा पुढचा प्लॅन काय?
जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सची बैठकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 11:34 AM
Share

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona Vaccination) प्रमाण मागील तीन महिन्यांपासून अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी औरंगाबादेत टास्क फोर्सची तातडीची बैठक आयोजित केली. मात्र या बैठकीला बहुतांश आमदार खासदारांनी सपशेल दांडी मारली. बैठकीला फक्त शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हजेरी लावली. शासन वारंवार लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाला आदेश देत आहे. त्यामुळे या मोहिमेत लोकप्रतिनिधींना सामावून घेत लसीकरण वाढवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला औरंगाबादेत यश येताना दिसत नाहीये. त्यामुळे आता गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या मदतीने लसीकरणाबाबत जनजागृती करत टक्का वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे.

उद्दिष्ट किती, लसीकरण किती?

पहिला डोस- 29 लाख 52 हजार 972 दुसरा डोस- 21 लाख 68 हजार 530 बूस्टर डोस- 50 हजार 991 एकूण उद्दिष्ट- 34 लाख

लोकप्रतिनिधींची अनास्था

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत टास्क फोर्सच्या वेळोवेळी बैठका झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नही केले गेले. मात्र लसीकरण वाढले नाही. याचे खापर लोकप्रतिनिधींनी प्रशासनावरच फोडले. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात असून लसीकरण वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. त्याकरिताच आमदार-खासदारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यालाही बहुतांश सर्वांनीच हरताळ फासला. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या बैठकीत आमदार अंबादास दानवे, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बी.बी. नेमाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी संगिता सानप , संगिता चव्हाण, कन्नडचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, पैठण – फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, घाटी रुग्णालायाच्या डॉ. वर्षा रोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.

पुढचा अॅक्शन प्लॅन काय?

– शहरात वॉर्ड, ग्रामीण भागात गावनिहाय लसीकरण वाढवण्यासाठी नगरसेवक , सरपंचांची मदत घेणार – 30 एप्रिलपूर्वी लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार – 12 ते 18 वयोगटासाठी विशेष मोहीम, शाळा, गल्ली, गावनिहाय लसीकरणाचा अॅक्शन प्लॅन तयार करून जनजागृती करणार. – नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यावर भर

इतर बातम्या-

Weight Loss : अतिरिक्त साखर आणि चमकदार पदार्थ खाणे सोडा आणि वजन कमी करा, वाचा खास टिप्स!

Nanded : शेत मजुरावर वन्य प्राण्यांचा हल्ला, जखमी मजुरावर उपचार सुरु

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.