ओबीसींना दुखावून कोणतंही काम करणार नाही; खासदार संभाजी छत्रपतींची ग्वाही

ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही. (Sambhaji Chhatrapati)

ओबीसींना दुखावून कोणतंही काम करणार नाही; खासदार संभाजी छत्रपतींची ग्वाही
sambhaji chhatrapati
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 12:00 PM

बीड: ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही, अशी ग्वाही देतानाच लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केले. (i am with obc community, says Sambhaji Chhatrapati)

खासदार संभाजी छत्रपती हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बीडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसींबाबतची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूंचा वंशज आहे, अठरा पगड जातीला एकत्र करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. ओबीसीला दुखावून मी कोणतही काम करू शकत नाही. त्यामुळं मी तसं बोललो. पुढाऱ्यांनी आता समाजाला फसवू नये. जे खर आहे ते सांगावं. 102 व्या घटना दुरूस्तीने राज्याचे अधिकार संपुष्टात आले आहेत, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

तर राजीनामा द्यायालाही तयार

मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला तर मार्ग निघणार का? निघत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मी भेट घेतली. ते मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठीशी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात माझा अभ्यास सुरू आहे. मात्र बहुजनांच्या प्रश्नासंदर्भात सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर मुख्यमंत्री करा

दरम्यान, बीडमध्ये एका कार्यक्रमात संभाजी छत्रपती यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना थेट मला मुख्यमंत्री करा, असं म्हटलं होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य त्यांनी केले होते. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजी छत्रपती व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

त्यावेळी संभाजी छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजी छत्रपती यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजी छत्रपती यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (i am with obc community, says Sambhaji Chhatrapati)

संबंधित बातम्या:

दिनो मोरिया हा BMC चा सचिन वाझे; सखोल चौकशी केल्यास अनेक पेंग्विन बाहेर पडतील; नितेश राणेंचं सूचक विधान

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

VIDEO: मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा: संभाजीराजे छत्रपती

(i am with obc community, says Sambhaji Chhatrapati)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.