AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021: औरंगाबादेत महाविकास आघाडीने खातं खोललं, आडगाव ग्रामपंचायत बहुमताने खिशात

औरंगाबादेत महाविकास आघाडीने खात खोललं असून आघाडीने आडगाव ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. (aurangabad grampanchayat election)

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021:  औरंगाबादेत महाविकास आघाडीने खातं खोललं, आडगाव ग्रामपंचायत बहुमताने खिशात
| Updated on: Jan 18, 2021 | 10:02 AM
Share

औरंगाबाद : संपूर्ण राज्यात मतमोजणीला सुरवात झाली आहे. हळूहळू निकाल समोर येत असून औरंगाबादेत महाविकास आघाडीने खात खोललं आहे. आघाडीने आडगाव ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. आगडगाव येथील 11 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवीत बहुमताने निवडणकू जिंकली आहे. ( in aurangabad Maha Vikas aghadi won its first grampanchayat election)

राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात मतमोजणी होत आहे. औरंगाबादेतही मतदान मोजणीकेंद्रांसमोर स्थानिक पुढाऱ्यांनी गर्दी केली असून यंदाचा विजयाचा गुलाल कुणाचा असेल याची उत्सुकता लागली आहे. यातच औरंगाबादेतील आडगाव ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. येथे महाविकास आडीचा विजय झाला असून जिल्ह्यात महाविकास आघाडीने खातं खोललं आहे. येथे महाविकास आघाडीने एकूण 11 जागांपैकी तब्बल 10 जागांवर विजय विजय मिळवला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालापैकी आडगावच्या माध्यमातून महाविकास आघाडीन खातं खोलल्यामुळे येथे जल्लोष साजरा होतोय. येथील निडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. आज दुपारपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, महाविकास आघाडीने पहिलाच विजय मिळवल्यामुळे आडगावमध्ये महाविकास आघाडीकडून आंनद साजरा केला जातोय.

दरम्यान राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

( in aurangabad Maha Vikas aghadi won its first grampanchayat election)

संंबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | राज्यातील 10 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 : आण्णा हजारे, पोपटराव, विखे, थोरात, रोहित पवार, राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.