Parbhani | चोरांची ही हिंमत? जिंतूरच्या पोलीस ठाण्यातूनच मोटरसायकल उचलली! पोलिसांना खुलं आव्हान

Parbhani | चोरांची ही हिंमत? जिंतूरच्या पोलीस ठाण्यातूनच मोटरसायकल उचलली! पोलिसांना खुलं आव्हान
जिंतूर पोलीस स्टेशनमधूनच मोटर सायकल चोरीला
Image Credit source: TV9 Marathi

जिंतूर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच चक्क एका होमगार्डच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर चोरी करण्याचा प्रताप अज्ञात चोरट्यांनी केलाय . त्यामुळे चोरट्यांनी आता थेट पोलिसांना आव्हान दिले आहे अशी चर्चा समान्यांतून व्यक्त होत आहे .

नजीर खान

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Mar 17, 2022 | 5:12 PM

परभणीः परभणी जिल्ह्यात चोरी (Parbhani Theft) आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता तर चोरीची एक घटना कळस गाठणारी ठरली आहे. जिंतूर पोलीस ठाण्याच्या (Jintur police station) आवारातूनच चोरट्यांनी मोटरसायकल (motorcycle stolen) चोरल्याची बातमी समोर आली आहे. काल बुधवारी जिंतूर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच बलसा येथील होमगार्डची ड्युटी करणाऱ्या संपत आंबोरे यांच्या मालकीची Mh 22k 4175 होंडा स्पेल्डर मोटारसायकल चोरी केल्याची घटना उघडकीस आल्याने आता चोरट्यांनी चक्क पोलिसांना आव्हान दिलंय, असं म्हटलं जात आहे. गुन्हेगारांवर आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र त्यांच्याच वाहनांवर चोरटे असा डल्ला मारू लागल्यावर सामान्यांनी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिंतूरच्या पोलीस यंत्रणेवर या निमित्ताने मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून समस्त पोलीस वर्गासमोर आता याचा तपास करण्याचे आव्हान आहे.

चोरी आणि घरफोडीच्या घटनांत वाढ

जिंतूर शहरासह परभणी जिल्ह्यातही मागील आठ महिन्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या. तर घरफोडीच्या ही अनेक घटना ही घडल्या. मंगळसूत्र चोरीच्या घटनाही सर्रास घडत आहेत. त्यामुळे चोरांवर पोलिसांचा वचक राहिला नाही, असा सूर उमटत आहे. त्यातच जिंतूरमधील ही घटना समोर आली आहे.

चोरांचं पोलिसांना थेट आव्हान

जिंतूर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच चक्क एका होमगार्डच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर चोरी करण्याचा प्रताप अज्ञात चोरट्यांनी केलाय . त्यामुळे चोरट्यांनी आता थेट पोलिसांना आव्हान दिले आहे अशी चर्चा समान्यांतून व्यक्त होत आहे . काल बुधवारी जिंतूर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच बलसा येथील होमगार्डची ड्युटी करणाऱ्या संपत आंबोरे यांच्या मालकीची Mh 22k 4175 होंडा स्पेल्डर मोटारसायकल चोरी केल्याची घटना उघडकीस आल्याने आता चोरट्यांनी चक्क पोलिसांना आव्हान दिलंय, असं म्हटलं जात आहे. आजवर चोरी झालेल्या अनेक दुचाक्यांचा तपास प्रलंबित असताना परत ही घटना घडल्याने जिंतूर शहरात चर्चेला उधाण आलाय . पोलीस ठाण्यात प्रशासनाच्याच गाड्या सुरक्षित नाहीत, तर मग सामान्यांचं काय असा प्रश्न सामान्यांना पडणे साहजिक आहे . दरम्यान , जिंतूर पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल तर करण्यात आला नाही. मात्र संशयिताचा सुगावा लागला असून लवकरच त्याला जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांनी tv9 ला फोन द्वारे दिली आहे .

इतर बातम्या-

दोन वर्षाच्या FD तूनही मिळणार नाही एवढा परतावा मिळाला आहे. कसा आणि कुठे फायदा झाला ते वाचा

Wardha Accident | नादुरूस्त टिप्परवर धडकली Travels; एक ठार, तीन गंभीर


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें