AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला मोठं यश, बैठक सुरू असतानाच सरकारने काढला थेट जीआर

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे, आपल्या मागणीसाठी त्यांनी नागपुरात मोठं आंदोलन केलं, अखेर बच्चू कडू यांच्या या मागणीला आता मोठं यश आल्याचं पहायला मिळत आहे.

सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला मोठं यश, बैठक सुरू असतानाच सरकारने काढला थेट जीआर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2025 | 9:38 PM
Share

राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाली, पावसानं चांगलंच झोडपून काढलं, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. राज्यातील अनेक भागांमध्ये तर शेतीची माती देखील वाहून गेली, हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. खरीप हंगाम पूर्णपणे नष्ट झाला. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजी घोषणा केली होती, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी राज्यात सध्या सुरू आहे, यावरून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या आपल्या मागण्यासाठी त्यांनी राज्यभरात दौरे केले, त्यापूर्वी त्यांनी उपोषण देखील केलं होतं.

दरम्यान बच्चू कडू यांनी राज्यभर दौरे केल्यानंतर अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात आंदोलनाची हाक दिली, या आंदोलनाला प्रचंड गर्दी जमली होती. बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळ सोडावे असे आदेश कोर्टाने बुधवारी दिले होते, मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं, पोलिसांनी आम्हाला एक तासाच्या आत अटक करावी, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलनस्थळी येऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. दरम्यान जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल रोखो करू असा इशाराही त्यांनी दिला होता.

त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये  ही बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसोबतच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती. अखेर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं पहायला मिळत आहे.

कर्जमाफीवर बैठक सुरू असतानाच सरकारने जीआर काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे.  सहा महिन्यांच्या आत  समितीला कर्जामाफिसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे.  या बैठकीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...