जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कोण?; शिवाजीराव कर्डीले किंगमेकर ठरणार?, बाळासाहेब थोरात म्हणतात…

जिल्हा बँकेचा पुढचा अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. याविषयी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर : नगरमध्ये जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. यावेळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट लढत पाहायला मिळाली. एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर बिनविरोध निवड झाली. बाकीच्या 4 जागांसाठीचे मतदान होऊन आज मतमोजणी पार पडली. त्यांनतर आता जिल्हा बँकेचा पुढचा अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. याविषयी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जिल्हा बँकेत आम्ही राजकारण करत नाही. पदाधिकारी निवड प्रक्रियेत सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ,” असे थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat comment on district bank president selection)

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. 21 पैकी 17 जागांवर बिनविरोध निवड झाली असली तरी उर्वरित 4 जागांसाठीची निवडणूक अतीशय चुरशीची झाली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे सुद्धा मोठ्या‌ फरकाने निवडून आले. महाविकास आघाडीकडे 14 तर भाजपकडे 7 जागा आहेत. त्यामुळे आता बँकेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा बँकेत आम्ही राजकारण करत नाही. पदाधिकारी निवड प्रक्रियेत आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ, असे थोरात म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा उपक्रम या बँकेने केलेला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे आमचं सूत्र असून ते आम्ही टिकवतो, असेही थोरात म्हणाले.

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या ‘किंगमेकर’ नेत्याची बाजी

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील नगर तालुका सेवा सोसायटीमधून अखेर भाजपचे किंगमेकर नेते शिवाजीराव कार्डिले (Shivajirao Kardile) यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी सत्यभामाबाई बेरड यांना अवघी 15 मते मिळाली. त्यामुळे शिवाजीराव कार्डिले यांनी निर्विवाद विजय मिळवला आहे.

तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांनी निसटता विजय मिळवला. पिसाळ यांना 37 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मिनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली. पारनेरमधून उदय गुलाबराव शेळके विजयी ठरले. शेळके यांना 99 तर रामदास भोसले यांना अवघी 6 मते मिळाली.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील 17 बिनविरोध उमेदवार

1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)

2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)

3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)

4) राहुल जगताप (श्रीगोंदा)

5) अमोल राळेभात (जामखेड)

6) सीताराम गायकर (अकोले)

7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)

8) अरुण तनपुरे (राहुरी)

9) माधवराव कानवडे (संगमनेर)

10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)

11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)

12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)

13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)

14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)

15) अमित अशोक भांगरे (अकोले)

16) गणपतराव सांगळे (संगमनेर)

17) विवेक कोल्हे (कोपरगाव)

संबंधित बातम्या

नगर जिल्हा सहकारी बँक : 17 जागा बिनविरोध, कर्डिलेंच्या जागेसाठी निवडणूक, भाजपच्या ‘किंगमेकर’ला धाकधूक

अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

(Balasaheb Thorat comment on district bank president selection)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI