’17 व्या दिवशी गोपीनाथ मुंडे आमच्यातून निघून गेले, त्यामुळे लोकांचा प्रचंड आक्रोश’, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

"माझे वडील मला म्हणाले की, विधानसभा लढवायची आहे. मी म्हटलं, बाबा मला राजकारणाशी काही देणंघेणं नाही. मला कशाला हवी विधानसभा? तुझी उमेदवारी जाहीर झाली. आता माझं नाक कापलं जाईल. तुला लढावच लागेल. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे यांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही", अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली.

'17 व्या दिवशी गोपीनाथ मुंडे आमच्यातून निघून गेले, त्यामुळे लोकांचा प्रचंड आक्रोश', पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
भाजप नेत्या पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 5:54 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात दाखल झाल्या. पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. पंकजा मुंडे यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मोठी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली. “आता माईकसुद्धा तुमच्या पसंतीचा घेतला तर उमेदवारदेखील तुमच्या पसंतीचा हवा की नको? मग अर्ज भरु ना? निवडून देणार ना? मला कुणाकुणाला निवडून द्यायचं आहे, हात वर करा. मी या देशातली अशी उमेदवार आहे जिच्याकडे बायोडेटा नाही. काही उमेदवार पुस्तक बनवतात. त्याला बायोडेटा म्हणतात. एक पुस्तक घेऊन लोकं येतात, ताई आमच्या कार्याचा आढावा बघा. आम्हाला उमेदवारी द्या. या देशात गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीखाली वाढलेल्या या मंचावरील प्रत्येक माणसाने कधीच मुंडे साहेबांकडे काहीच मागितलं नव्हतं”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझे वडील मला म्हणाले की, विधानसभा लढवायची आहे. मी म्हटलं, बाबा मला राजकारणाशी काही देणंघेणं नाही. मला कशाला हवी विधानसभा? तुझी उमेदवारी जाहीर झाली. आता माझं नाक कापलं जाईल. तुला लढावच लागेल. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे यांची आज्ञा मी कधीच खाली पडू दिली नाही. त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी एवढ्या कष्टानंतर, त्यावेळी कुणीच आमच्या बाजूने नव्हतं. सरकार आमच्या बाजूने नव्हतं. पण तरीही गोपीनाथ मुंडे निवडून आले आणि 17 व्या दिवशी गोपीनाथ मुंडे आमच्यातून निघून गेले. त्यामुळे लोकांचा प्रचंड आक्रोश आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘त्यामुळे मी प्रीतम ताईंना उभं केलं’

“लोकांची इच्छा नव्हती की उमेदवारी दुसऱ्या कुणाला द्यावी आणि राष्ट्रवादीने तेव्हा जाहीर केलं होतं की, घरामधला उमेदवार असेल तर आम्ही उमेदवार देणार नाही. मी जर राज्यात राहीले नसते तर भरपूर गडबड झाली असती. त्यामुळे मी प्रीतम ताईंना उभं केलं. प्रीतम ताई बिचाऱ्या डॉक्टर. त्यांचा राजकारणाशी कधी संबंध नाही आला. पण त्यांनी इतकं सुंदर काम केलं. बघा मी पराक्रमी आहे आणि प्रीतम मुंडे या परिक्रमा करणाऱ्या आहेत. त्यांनी या जिल्ह्याच्या जेवढ्या परिक्रमा केल्या तेवढ्या मी करु शकत नाही आणि पराक्रमही करु शकत नाही”, असं पंकजा मुंडे म्हाणाल्या.

‘माझ्या एका निर्णयाने लाखो ऊसतोड कामगारांना…’

“माझ्या एका सहीने, एका निर्णयाने लाखो ऊसतोड कामगारांना पैस मिळू शकतात. मी एका सहीने या जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा पीकविमा देऊ शकते. मी सप्त्यांना जाऊ शकत नाही, मी लग्नांना जाऊ शकत नाही, लोकांच्या दु:खांना जाऊ शकत नाही, मी एखाद्याचा दवाखानाचा फोन असला तर तो घेऊ शकत नाही. मी माझ्या व्यवस्था आणि व्यस्ततेमुळे अत्यंत सुंदर काम केलं ते प्रीतम ताईंनी”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या आणि…’

“मी आज पुण्याहून निघाले. आमच्या पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा आणि शुभआशीर्वाद दिला. त्यानंतर मी अहमदनगर जिल्ह्यात आले. आमचे बाबुरावजी पाचर यांच्या घरी गेले. त्यांच्या मुलालासुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद दिले. अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे पाटील हे सुद्धा माझ्यासोबत आले. त्यांना शुभेच्छा दिल्या. या सगळ्यांकडून फिरत-फिरत मी माझ्या जिल्ह्यात आले”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या

“मी बातम्या पाहिल्या. पंकजा मुंडे यांना कुणाचं चॅलेंज असेल? मी म्हटलं समोरच्या पक्षाचा उमेदवार हा फक्त समोरच्या पक्षाचा उमेदवार पाहते. मी दुसऱ्या चष्म्यातून पाहत नाही. माझ्या बीड जिल्ह्याची जनता सुद्धा त्यांना दुसऱ्या चष्म्यातून पाहत नाही. नाहीतर 40 वर्षे सत्तेत असतानासुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिशी ही बहादूर जनता आली नसती”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.