भंडारा : जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसात जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत होते. या पुराचा फटका नदी, नाल्या काठावरील गावांना बसला आहे. तुमसर तालुक्यातील (farmers in Tumsar taluka) पिपरा (Pipra) गावात संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था आहे. या आधारभूत धान खरेदी केंद्रांवर (paddy buying center) शेतकऱ्यांची धान खरेदी केली होती. पण दोन दिवस आलेल्या पावसाने या संस्थेचे हजारो क्विंटल धान पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या धानाची पोती नाल्याच्या बाजूला पडलेली आहेत.हे धान आता सडले आहे. त्यामुळं कोण खरेदी करू शकणार नाही.