भंडारा : जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द (Nilaj Khurd) येथील सुशिकला आगाशे (Sushikala Agashe). तिचे वडील दुर्गाप्रसाद (Durga Prasad Agashe) हे शेतकरी आहेत. आई नंदा या गृहिणी आहेत. घरी एक एकर शेती. पण, त्यांना पाच मुली आहेत. त्यांनी शिकावी ही आईवडिलांची इच्छा. पाच मुलींपैकी दोघींना खेळाची आवड होती. 2013 ची गोष्ट सुशिकला गावच्या शाळेत शिकत होती. एकेदिवशी शारीरिक चाचणी झाली. सुशिकलाची निवड पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत झाली. तिथं गेल्यानंतर तिला सायकलिंग हा गेम मिळाला. सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. पुरस्कार, मेडल्स मिळाल्यावर तिचा आनंद द्विगुणित होत होता. स्थानिक पातळीवर स्पर्धा गाजविल्यानंतर ती राज्यस्तरीय स्पर्धेत गेली. खेलो इंडियातही सुशिकलानं चमक दाखविली.