AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता झाला कहर; बोगस निवडणूक पथकाने व्यापाऱ्याला घातला इतक्या लाखांचा गंडा, तुम्ही पण राहा सतर्क

Bogus Election Team : सायबर गुन्हेगारांनी मोठा कहर केला आहे. एखादा मॅसेज, कॉल, ई-मेल अथवा समाज माध्यमावर काही तर आमिष दाखवून फसवणुकीचा डाव साधण्यात येतो. पण काही भामट्यांनी विधानसभा निवडणुकीतच हात धुवून घेतले आहेत. बोगस निवडणूक पथक सुरू करत व्यापाऱ्याला गंडा घातल्याचे समोर आले आहे.

आता झाला कहर; बोगस निवडणूक पथकाने व्यापाऱ्याला घातला इतक्या लाखांचा गंडा, तुम्ही पण राहा सतर्क
बोगस निवडणूक पथकाचा व्यापाऱ्याला गंडाImage Credit source: छायाचित्र पुर्णतः प्रतिनिधीक
| Updated on: Nov 13, 2024 | 10:48 AM
Share

भामटे फसवणुकीसाठी काय युक्ती लढवतील सांगताच येत नाही. सायबर सुरक्षेसाठी दररोज अनेक मॅसेज आपल्या मोबाईलवर येऊन धडकतात. एखादा मॅसेज, कॉल, ई-मेल अथवा समाज माध्यमावर काही तर आमिष दाखवून फसवणुकीचा डाव साधण्यात येतो. तर काही भामट्यांनी विधानसभा निवडणुकीतच हात धुवून घेतले आहेत. या पुठ्ठ्यांनी बोगस निवडणूक पथकच काढले आहे. एका नाक्यावर तपासणीचे ढोंग करत व्यापाऱ्याला गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तुमच्या वाहनाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे अगोदर त्यांचे ओळखपत्र जरूर मागा. नाहीतर तुम्हाला बोगस पथकाकडूही गंडा घातल्या जाऊ शकतो.

व्यावसायिकाला 25 लाखांचा गंडा

कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. कोल्हापुरात बोगस तपासणी पथकाने व्यवसायिकाचे 25 लाख रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून फसवणूक केली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली आहे. आरोपींनी व्यापारी सुभाष हारणे यांची फसवणूक केली आहे.

तपासणीचा केला बनाव

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासकीय अधिकारी अनेक वाहनांची तपासणी करत आहेत. व्यापारी हरणे हे यात्रेमध्ये पाळणा लावण्याचे काम करतात. ते सोमवारी 25 लाख 50 हजारांची रक्कम घेऊन तावडे हॉटेल येथे आले होते. त्यावेळी 25-30 वयोगटातील अज्ञात पाच जणांनी त्यांची कार अडवली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची कार तपासणीचे नाटक केले. कारच्या झडतीत त्यांच्या हाती ही रक्कम लागली. आरोपींनी त्यांनी त्यांच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर त्यांचा मोबाईल आणि रक्कम घेऊन ते पसार झाले. या प्रकारामुळे हारणे यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. त्यांनी फिर्याद दिली.

तुम्ही राहा सतर्क 

हा प्रकार कोल्हापूर येथे उघड झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. असे प्रकार इतर ठिकाणी घडू शकतात. तेव्हा वाहनधारकांना शंक आल्यास त्यांनी अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी करावी. तर काही शंका आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, म्हणजे त्यांची फसवणूक होणार नाही आणि काही शंका आल्यास ती दूर होईल.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.