महापालिकेपूर्वी अजितदादांची मोठी खेळी, शिंदेंना बसणार मोठा धक्का? नेमकं काय घडणार?
पुढील काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे, त्यापूर्वी घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी अजित पवार गटात दोन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आम्ही महायुती म्हणूनच लढणार, मात्र काही ठिकाणी जिथे अपवादात्मक परिस्थिती असेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील. मात्र मैत्रिपूर्ण लढत हा पहिला पर्याय निश्चित नसेल तर महायुतीमध्येच निवडणुका लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे दोन बडे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दोन ऑगस्टला रायगड जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन बड्या नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचं बोललं जातं आहे. महाड मतदार संघातून मंत्री भरत गोगावले तर अलिबागमधून आमदार महेंद्र दळवी यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवी खेळी खेळल्याचं दिसून येत आहे.
येत्या दोन ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. महाड माणगाव मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे तर अलिबाग मधून 2009 ची लोकसभा लढवलेले आणि माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सुनील तटकरे यांचा नवा राजकीय डाव येत्या दोन ऑगस्टला सर्वांना पाहायला मिळणार असून, रायगड जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.
