मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, शिंदेंनी गेम फिरवला
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर बुधवारी मत मोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाराजी नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं, अनेक इच्छूक उमेदवारांनी ऐनवेळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे अनेक पक्षांची डोकेदुखी वाढल्याचं पहायला मिळालं. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त इनकमिंग भाजपमध्ये झालं, त्याचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला, यामुळे आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील संघर्ष वाढला आहे. भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवरून शिवसेना शिंदे गटानं अनेकदा जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील मोठा फटका बसला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना महाडमधून मोठी बातमी समोर आली आहे.
महाड नगरपालिका निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी शहर प्रमुख पराग वडके यांनी थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. पराग वडके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना पक्षानं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी बंड करत नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पराग वडके यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील कविसकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इतकंच नाही तर शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना समर्थन देत सर्वांनी शिवसेनेच्याच उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. दरम्यान पराग वडके यांच्या पाठिंब्यामुळे महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून, यामुळे आता इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर यामुळे शिवसेना शिंदे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
