भाजपला मोठा धक्का, नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार?
डोंबिवलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपला डोंबिवलीत जोरदार धक्का बसला आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

डोंबिवलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपला डोंबिवलीत जोरदार धक्का बसला आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत.
डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे त्यांनी स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्याचा अभाव आणि विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी त्यांनी एकदा राजीनामा दिला होता. मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समजुतीनंतर त्यांनी पदावर पुनरागमन केले होते.
मात्र त्यानंतर आता पुन्हा, आजूबाजूच्या वार्डांना भरघोस निधी दिला जात असून, आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा राजीनामा दिला.”सत्तेत असूनही निधी मिळत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे विकासकामे अडकली आहेत. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला,” असे विकास म्हात्रे यांनी स्पष्ट केले. दरम्यान कुठल्या पक्षात प्रवेश करणार यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सर्वच पक्षांशी चर्चा सुरू आहे, मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून मानसन्मान मिळाल्यास आम्ही त्या पक्षात प्रवेश करू, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
भाजपसाठी मोठा धक्का
दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छूकांचे महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश सुरू आहेत. मात्र दुसरीकडे आता डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे, ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
