‘हा’ पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती? मोठी बातमी समोर
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातून मोठी बातमी समोर आली आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोणत्याही पक्षासोबत युती होऊ शकते. एवढंच नाही तर युतीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील राष्ट्रावादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युती म्हणून लढवल्या जाणार की? स्वबळावर लढणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे, यातच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोणत्याही पक्षासोबत युती होऊ शकते. एवढंच नाही तर पक्षाला युतीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील खुला असणार आहे. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांवर सोपविले जाणार आहेत.
दरम्यान सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळत आहे की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यास फारसे इच्छूक नाहीत, अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काय निर्णय घेणार? महाविकास आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढवणार की? स्वबळाची परीक्षा घेणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोणत्याही पक्षासोबत युती होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांचं चित्र कसं असणार? कोण कोणासोबत युती करणार? तर कोण स्वबळावर निवडणूक लढवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
