AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : अखेर प्रतीक्षा संपली, राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुका जाहीर

राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.

मोठी बातमी : अखेर प्रतीक्षा संपली, राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, निवडणुका जाहीर
ELECTION COMMISION Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 06, 2023 | 7:51 PM
Share

मुंबई : राज्यात बहुचर्चित असलेल्या निवडणुकांची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा पोटनिवडणुका झाल्या. त्यामुळे राज्यात आणखी काही रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक कधी जाहीर होणार याचीच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर निवडणूक आयोगाने या निवडणूक जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक होणाऱ्या ठिकाणी आजपासूनच आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रमही जाहीर केला आहे.

राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

सदस्याचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. मात्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत.

उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.