AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खड्ड्यात ढकलत अधिकाऱ्याला कानशिलात, भाजप नगरसेवकाचा प्रताप

भुसावळ पालिकाचे भाजप नगरसेवक नरेंद्र सिंह ठाकूर यांनी पालिका अधिकाऱ्याला खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करत त्यांच्या कामशिलात लगावली.

खड्ड्यात ढकलत अधिकाऱ्याला कानशिलात, भाजप नगरसेवकाचा प्रताप
| Updated on: Dec 25, 2020 | 11:05 AM
Share

भुसावळ : पालिकेच्या अधिकाऱ्याला खड्डा बुजवण्यासाठी वारंवार सांगून देखील लक्षात येत नसल्याने भाजपने नगरसेवकाने अधिकाऱ्याला खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करत कानशिलात लावली. अधिकाऱ्यालाच खड्ड्यात ढकलून कानशिलात लगावल्याने शहरात खळबळ उडलीय. (BJP Carporater mahendra Sinhh thackur Slaped Bhusaval Carporation officer)

भुसावळ शहरातील प्रभाग क्र. 20 मध्ये अमृत योजनेच्या कामासाठी गेल्या आठ दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध खड्डा खोदण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील दोन तीन नागरिक या गाड्यांमध्ये पडले होते. त्यामुळे हे काम तातडीने उरकून खड्डा बुजवावा अशी विनंती येथील स्थानिक सत्ताधारी भाजपचे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी ३ दिवसांपूर्वी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना केली होती. मात्र अधिकाऱ्यांने हात जोडून देखील दखल न घेतल्याने नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्याला या खड्ड्यात ढकलण्याचा प्रयत्न करून कानशिलात लगावली.

भुसावळ येथे अमृत योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 20 मध्ये याच कामासाठी गेल्या आठ दिवसापासून रस्त्याच्या मधोमध खड्डा करण्यात आला होता. मात्र रस्त्याच्या मधोमध खड्डा असल्यामुळे रात्रीच्या सुमारास तीन ते चार जण या खड्ड्यात पडले होते. त्याकरिता गेल्या तीन दिवसापूर्वी प्रभाग क्र. 20 चे भाजप नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करत तातडीने काम करून खड्डा बुजवण्याची मागणी केली होती.

मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज अमृत योजनेच्या या अधिकाऱ्याला खड्डयात ढकलण्याचा प्रयत्न करुन नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी अधिकाऱ्याला चोप दिल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र यापूर्वीही भाजपचे नगरसेवक महेंद्र सिंग ठाकूर यांनी आपल्या प्रभागातील कामे होत नसल्याने आपली किडनी विकायला काढून भाजपला घरचा आहेर देत खळबळ उडवून दिली होती.

(BJP Carporater mahendra Sinhh thackur Slaped Bhusaval Carporation officer)

हे ही वाचा

वाजपेयींचं 13 दिवसांचं सरकारही शरद पवारांनी चीत केलं?

PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला शुभेच्छा, इंदापूरचं शेतकरी कुटुंब भारावलं

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....