AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ठाकरे सरकार पडल्यास भाजप सत्ता स्थापन करणार?; भाजप पुढील 4 पर्याय कोणते?

Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. राज्याच्या विधानसभेत बहुमतासाठी 145 चा आकडा महत्त्वाचा आहे. या 288 आमदारांपैकी एकाचं निधन झालं आहे. तर दोन आमदार तुरुंगात आहे.

Eknath Shinde : ठाकरे सरकार पडल्यास भाजप सत्ता स्थापन करणार?; भाजप पुढील 4 पर्याय कोणते?
ठाकरे सरकार पडल्यास भाजप सत्ता स्थापन करणार?; भाजप पुढील 4 पर्याय कोणते? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2022 | 3:20 PM
Share

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  आता शिवसेनेतून बाहेर पडल्यात जमा आहे. शिंदे यांनी पाठवलेला प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी फेटाळून लावला आहे. या शिवाय गटनेतेपदावरून शिंदे यांची हकालपट्टी करत अजय चौधरी यांच्याकडे गटनेतेपदाची धुरा दिली आहे. दुसरीकडे शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेनेचं (shivsena) नाव काढून टाकत आता परत येणे नाहीच, असे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारवरील संकट कायम आहे. हे सरकार कधीही कोसळण्याची चिन्हे दिसत आहे. दुसरीकडे ठाकरे सरकार पडल्यानंतर कोणती रणनीती आखायची याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हे भाजपचे नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. अहमदाबादमध्ये ही भेट होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अहमदाबादला रवाना होत आहे. आघाडी सरकार पडल्यास भाजपकडे चार पर्याय असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. राज्याच्या विधानसभेत बहुमतासाठी 145 चा आकडा महत्त्वाचा आहे. या 288 आमदारांपैकी एकाचं निधन झालं आहे. तर दोन आमदार तुरुंगात आहे. त्यामुळे ही संख्या 285 वर आली आहे. सध्या उद्धव ठाकरे सरकारकडे 152 आमदार आहेत. अशा स्थितीत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही बंड करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 13 आमदार सोबत आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे 25 आमदारांचा आकडा असल्याचं सांगितलं जात आहे. हे 25 आमदार भाजपसोबत आल्यास राज्यात भाजपची सत्ता येऊ शकते.

पहिला पर्याय

भाजपकडे 106 आमदार आहेत. त्यांना सहा अपक्षांचा पाठिंबा आहे. म्हणजे भाजपकडे 112 आमदारांचं संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे 25 आमदार भाजपला येऊन मिळाले आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते.

दुसरा पर्याय

दुसरा पर्याय म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बंडखोर आमदारांना घेऊनही भाजप सरकार स्थापण्याचा दावा करू शकते. भाजपकडे 112 आमदार आहेत. राष्ट्रवादीकडे 53 आमदार आहेत. मात्र, शिवसेनेचे 25 बंडखोर आमदार भाजपसोबत आल्यास भाजप सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. मात्र, भाजपला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे.

तिसरा पर्याय

तिसरा पर्याय म्हणजे भाजप आणि शिवसेना एकत्रित येऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. तर भाजपकडे 112 आमदारांचं बळ आहे. त्यामुळे पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी शिवसेना भाजपसोबत जाऊ शकते. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना भाजप सोबत जाईल का? याची शक्यताही कमी असल्याचं सांगितलं जात आहे.

चौथा पर्याय

शिवसेनेच्या बंडखोर 25 आमदारांना सोबत घेतल्यानंतर सरकार स्थापनेचा दावा करण्याऐवजी भाजप निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता अधिक आहे. मध्यावधी निवडणुकांचा पर्याय भाजपकडून निवडला जाऊ शकतो. शिवसेना फोडून किंवा फोडाफोडीचं राजकारण करून सत्ता मिळवल्याचा ठपका आपल्यावर येऊ नये म्हणून भाजप निवडणुकांना सामोरे जाण्याचा पर्याय निवडू शकते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.