लग्नाला अवघे तीन दिवस, दुचाकीस्वार वधूचा अपघाती मृत्यू

लग्नासाठी काही खरेदी करण्यासाठी वधू वैशाली पाटील मावसभावंडांसह दुचाकीवरुन निघाली होती. मात्र दुचाकी पडून झालेल्या अपघातानंतर ट्रकखाली चिरडून तिला प्राण गमवावे लागले.

लग्नाला अवघे तीन दिवस, दुचाकीस्वार वधूचा अपघाती मृत्यू

धुळे : लग्नाला अवघे तीन दिवस बाकी असताना वधूचा अपघाती मृत्यू झाल्याने धुळ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीवरुन पडल्यानंतर ट्रकखाली चिरडल्यामुळे वैशाली पाटील हिचा मृत्यू (Bride Two Wheeler Accident) झाला. रविवारी सकाळी दहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

धुळे तालुक्यातील कापडणे गावात राहणाऱ्या तरुणासोबत वैशालीचा विवाह 20 नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र त्यापूर्वीच काळाने घाला घातल्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नघरातील वऱ्हाडी मंडळींच्या आवाजाने गजबजणारा मंडप काही क्षणातच हंबरड्यांनी भरुन गेला.

शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर भागात राहणारे शेतकरी मुरलीधर नाना पाटील-बोरसे यांची द्वितीय कन्या वैशाली उर्फ कादंबरी हिचा विवाह येत्या बुधवारी होणार होता. त्याआधी हळद आणि साखरपुड्याचा कार्यक्रम निश्चित होता.

लग्नासाठी काही खरेदी करण्यासाठी वधू वैशाली तिचा 20 वर्षीय मावसभाऊ राकेश मुरलीधर पाटील आणि 18 वर्षीय मावस बहीण काजल पाटील यांच्यासह दुचाकीवरुन निघाली होती. काल (रविवारी) सकाळी दहा वाजताच्या सुमारास तिघं चालले असताना वाघाडी गावाजवळ ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर धडक झाली.

बायकोचे दागिने विकले, 79 वर्षीय मुंबईकराला स्पॅनिश मैत्रिणीने दीड कोटींना धुपवलं

यामध्ये राकेश आणि काजल हे रस्त्याच्या एका बाजूला फेकले गेले, तर वैशाली ही मुख्य रस्त्यावर पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळेस मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली आल्याने ती गंभीर जखमी झाली.

वैशालीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र दाखल करण्याआधीच तिला मृत्यूने (Bride Two Wheeler Accident) गाठलं. या घटनेमुळे वधूसह वराच्या कुटुंबावरही शोककळा पसरली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *