भंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू

हे दोघे चिमुरडे संध्याकाळी खेळताना या गाडीत बसले असावे. दरम्यान, गाडी लॉक झाली आणि ती त्या दोघांना उघडता आली नाही.

भंगारातील कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक, चिमुकल्या भावांचा गुदमरुन मृत्यू

रायगड : भंगार गोडाऊन शेजारी भंगारमध्ये घेतलेल्या बंद होडा सिटी कारमध्ये गुदमरल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू (Brothers Choked In Locked Car) झाला आहे. कारचे दारं लॉक झाल्याने या सख्ख्या भावांचा गुरमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली (Brothers Choked In Locked Car).

सुहेल खान (वय-6) आणि अब्बास खान (वय-4) अशी या दोन भावंडांची नावं आहेत. हे दोघे चिमुरडे संध्याकाळी खेळताना या गाडीत बसले असावे. दरम्यान, गाडी लॉक झाली आणि ती त्या दोघांना उघडता आली नाही. त्यामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घरातील आणि परिसरातील लोकांना सदरची घटना कळताच पोलिसांना कळविण्यात आले.

महाड शिरगाव येथील साळुखें रेस्क्यु टीमच्या सहाय्याने कार उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, कार बाहेरुन उघडण्यात अपयश आल्याने अखेर कारच्या काचा फोडुन चिमुरड्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तात्काळ दोन्ही चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामिण रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहेत. महाड औद्योगिक वसाहत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Brothers Choked In Locked Car

संबंधित बातम्या :

बायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *