AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणार आहे. ऑगस्ट १ रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येईल. गडकरी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
नितीन गडकरीImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 23, 2025 | 12:47 PM
Share

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना २०२५ चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा सन्मान प्रदान केला जाईल. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी १०:३० वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती घेतली.

यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते आणि या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. या सोहळ्यात टिळक महाविद्यालयाच्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, टिळक महाविद्यालय ट्रस्टच्या आणि टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे हेही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे आधारस्तंभ डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.

नितीन गडकरींना निवडण्यामागचे कारण

डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्कारासाठी नितीन गडकरींना निवडण्यामागचे कारण सांगितले. यामागे त्यांची दूरदृष्टी आणि देशाच्या विकासातील भरीव योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून गडकरी यांनी देशभर महामार्गांचे जाळे उभारले, असे डॉ. रोहित टिळक म्हणाले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (PPP) प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नांनी लोकचळवळीचे स्वरूप आले. लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत नितीन गडकरी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार त्यांच्याकडून होत आहे. तसेच, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची विक्रमी वेळेत उभारणी हे त्यांच्या कार्याचे उत्तम उदाहरण आहे, ज्यात त्यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारीचे प्रारूप यशस्वीपणे वापरले. देशाच्या प्रगतीसाठी दर्जेदार रस्त्यांना पर्याय नाही, ही गडकरींची भूमिका महत्त्वाची असल्याचेही डॉ. टिळक यांनी अधोरेखित केले.

पुरस्काराचे स्वरूप आणि इतिहास

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे स्वरूप आहे. १९८३ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिला पुरस्कार एस.एम. जोशी यांना प्रदान करण्यात आला होता. आजवर अनेक दिग्गजांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, मॉटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पुनावाला आणि सुधा मूर्ती यांचा समावेश आहे.

लोकमान्यांची चतुःसूत्री आणि गडकरींचे कार्य

डॉ. रोहित टिळक यांनी लोकमान्यांची स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची असल्याचे नमूद केले. नितीन गडकरी हे राजकारण हे सामाजिक-आर्थिक बदलाचे साधन आहे, या भूमिकेतून कार्यरत आहेत आणि लोकमान्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यातून पुढे नेत आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यात, लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थींच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा एक इंग्रजी ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.