AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी तसं बोलायला नको होतं… त्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांची तीव्र नाराजी

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे. त्यामध्येच अजित पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यातील भाजपामध्ये कमालीची नाराजी बघायला मिळत आहे.

अजित पवारांनी तसं बोलायला नको होतं... त्या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांची तीव्र नाराजी
Ajit Pawar and Chandrashekhar Bawankule
| Edited By: | Updated on: Jan 03, 2026 | 1:10 PM
Share

राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडलंय. या पालिका निवडणुकीत संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. कुठे युती, महाआघाडी तर कुठे विरोधात निवडणुका लढवल्या जात आहेत. नुकताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले. थेट अजित पवारांबद्दल बोलताना बावनकुळे दिसले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही असे ठरवले आहे की, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलं आहे की, मित्र पक्षात निवडणूक लढवताना मनभेद आणि मतभेद होणार नाही याची काळजी तिन्ही पक्षांनी घ्यायची आहे, अजित पवार असे का बोलले ते मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको होतं.

आम्ही समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की, मित्र पक्षात विरोधात जरी लढलो तरी महायुतीत कुठलेही मनभेद मतभेद होणार नाही सर्वांनी घ्यायची आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या भाषणात कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यांवर टीका केली नाही. त्यामुळे अजित पवार आणि सर्वांना विनंती राहील, की मित्र पक्षात मनभेद मतभेद करू नये एवढी विनंती आहे.

आम्ही त्या भानगडीत पडणार नाही, मित्र पक्षात मोठ्या भावाच्या रूपात आहोत त्यामुळे कुठली उत्तर देणे टीकाटप्पनी करणार नाही.  शेतकरी स्टॅम्प ड्युटी माफीबद्दल बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, शेतकरी जेव्हा पीक कर्ज घेतो, आता दोन लक्ष रुपयापर्यंत स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, हा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महसूल खात्याने घेतलेला आहे, ज्यामुळे जे शेतकरी आता पीक कर्ज घेतील, दोन लाखापर्यंत पीक कर्ज घेतील त्यांना आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही.

सर्व सहकारी बँका, रिझर्व बँकेच्या माध्यमातून चालणाऱ्या सर्व बँक या निर्णयाचा पालन करतील. नोटिफिकेशन निघालेला आहे, आजपासून हा निर्णय लागू होईल. जे शेतकरी कर्ज घेतात त्यांना हा निर्णय लागू होणार आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, ऑलरेडी सगळे नोट तयार असतात, इकडे नोट तयार असतात, फक्त मीडियासमोर येण्याकरिता हा प्रपंच केला असतो. सोलापूर हत्या प्रकरणावर बोलताना त्यांनी मोठे विधान केले.

बावनकुळे यांनी म्हटले की, तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील, भाजपचा किंवा काँग्रेसचा राहो गुन्हा करू नये. जे काही झालं असेल त्यामध्ये पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. चंद्रपुरातील वादाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, कुठेही वाद होणार नाही, भाजपचा कार्यकर्ता वाद करणार नाही, ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे झालं त्या ठिकाणी कारवाई केलेला आहे.

जिल्हाध्यक्षांना काढून टाकले आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळाली ते शंभर टक्के निवडून येतील, निवडणुकीच्या मोडमध्ये गेलो आहोत तिकिटाचा विषय संपला आहे. बिनविरोध नगरसेवकच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, चौकशी केली पाहिजे, मागणी आहे जे काही बिनविरोध उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत हे सर्व तिथल्या तिथल्या स्थानिक विषयांमध्ये त्या ठिकाणी उमेदवारांनी समर्थन दिले आणि मॅक्झिमम महायुतीचे का आले कारण जनतेला आणि आमच्या विरोधात जे उभे राहिले त्यांना कळलेला आहे की, विकासाच राजकारण होईल अन डबल इंजनच्या माध्यमातून विकास होईल.

कोणी कोणावरही दबाव टाकेल आणि कोणी उमेदवारी मागे घेईल, असं महाराष्ट्रात होत नाही.  महाराष्ट्र हा प्रगल्भ आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले ते तिथल्या विकासाच्या विषयावर प्राधान्यावर अर्ज मागे घेतले आहेत. हा चांगला पायंडा आहे, असाच पायंडा राज्यात असायला पाहिजे, विकासाला यामुळे चालना मिळते बिनविरोध झालेले जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी आत्ता ज्या ज्या उमेदवारांनी यांनी मदत केली आहे त्यांना सोबत घ्यावे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

जिथं टेंडर, तिथं सरेंडर ही ठाकरेंची भूमिका', शिंदेंचा ठाकरेंना टोला
जिथं टेंडर, तिथं सरेंडर ही ठाकरेंची भूमिका', शिंदेंचा ठाकरेंना टोला.
वसई-विरारमध्ये भाजप उमेदवारांकडून ओवाळणी फंडा, प्रचारात पैसे वाटप?
वसई-विरारमध्ये भाजप उमेदवारांकडून ओवाळणी फंडा, प्रचारात पैसे वाटप?.
'नोटा'चं बटण तरी 66 नगरसेवक बिनविरोध का? मनसे कोर्टात जाणार!
'नोटा'चं बटण तरी 66 नगरसेवक बिनविरोध का? मनसे कोर्टात जाणार!.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्याची हत्या - प्रणिती शिदें
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्याची हत्या - प्रणिती शिदें.
खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार? जलील यांचा रोख कुणावर?
खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार? जलील यांचा रोख कुणावर?.
मुंडे यांनी पोरांना विचारलं धुरंधरमधला हिरो कोण? विद्यार्थी म्हणाले...
मुंडे यांनी पोरांना विचारलं धुरंधरमधला हिरो कोण? विद्यार्थी म्हणाले....
दादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप! चव्हाण म्हणाले, मी फडणवीसांना..
दादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप! चव्हाण म्हणाले, मी फडणवीसांना...
66 बिनविरोध निवडींवरून मनसे आक्रमक अन थेट कोर्टात जाणार - अविनाश जाधव
66 बिनविरोध निवडींवरून मनसे आक्रमक अन थेट कोर्टात जाणार - अविनाश जाधव.
मुस्लिम नको आपल्याला...अशोक चव्हाण अन् डी.पी. सावंत यांची ऑडिओ व्हायरल
मुस्लिम नको आपल्याला...अशोक चव्हाण अन् डी.पी. सावंत यांची ऑडिओ व्हायरल.
Pune |पुण्यात MPSC विद्यार्थी आंदोलन, जरांगेंचा थेट उदय सामंतांना फोन
Pune |पुण्यात MPSC विद्यार्थी आंदोलन, जरांगेंचा थेट उदय सामंतांना फोन.