राजकारणात खळबळ! अजित पवार आणि शिंदेंना संपवण्याचा CM फडणवीसांचा प्रयत्न? आमदाराचा गंभीर आरोप
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक विधान केले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
CM फडणवीसांवर गंभीर आरोप
जळगावमध्ये बोलताना आमदार रोहित पवारांनी खळबळजनक विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करताना रोहित पवार म्हणाले यांनी, ‘लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब काही लोकांना हाताशी धरून अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतायेत. भाजपच्या जवळ जो-जो जातो भाजप त्याला हळूहळू राजकीय दृष्ट्या जीवनातून संपवतो हे आपल्याला माहिती आहे.’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला मदतीचा प्रस्तावच दिला नाही – रोहित पवार
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्तावच दिला नाही असं विधान केले आहे. पवार म्हणाले की, ‘मंत्रालयामध्ये कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं आहे याबाबत चर्चा होतात. नुकसानामुळे शेतकऱ्यांची काय परिस्थिती वाईट झाली आहे, आता शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार किती उदासीन आहे हे यावरून लक्षात येतं. गुजरातला प्रस्ताव न पाठवता केंद्र सरकारने हजार कोटी पाठवले होते. मग महाराष्ट्राने काय कुणाचे घोडे मारले आहे? गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक लाख कोटी रुपये जीएसटी भरला आहे. तोच आमचा शेतकरी आज अडचणीत आहे आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात.’
अमित शहांना राज्यासाठी निधीची घोषणा करायला हवी होती – रोहित पवार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहिल्यानगर दौऱ्यावर होते. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘शेतकरी असतील युवा वर्गातील बेरोजगार असतील या सर्वांच्याच बाबतीत केलेल्या घोषणांचा सरकारला विसर पडलेला आहे. दहा हजार कोटी महाराष्ट्राला देत आहोत अशी घोषणा भाषणातून अमित शहा करतील अशी अपेक्षा होती. मात्र महाराष्ट्रासाठी कुठलीही घोषणा झाली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
