Uddhav Thackeray | होय, मुंबईबाबत मी अहंकारी : उद्धव ठाकरे

नवीन वर्षाचं स्वागत करताना सावध राहा" असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

Uddhav Thackeray | होय, मुंबईबाबत मी अहंकारी : उद्धव ठाकरे

|

Dec 20, 2020 | 3:15 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. “कोरोनाची लस आल्यानंतरही मास्क घालणं बंधनकारक असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. युरोप-इंग्लंडमध्ये आजवरचा सर्वात कडक लॉकडाऊन झाला, याचं कारण वाढत्या गर्दीसोबतच कोरोनाने अवतार बदलला, हे आहे. सार्वजनिक ठिकाणी येता जाताना मास्कचा वापर करावा, नवीन वर्षाचं स्वागत करताना सावध राहा” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. (CM Uddhav Thackeray 20th December Speech Live Updates)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 20 Dec 2020 03:15 PM (IST)

  उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारी 10 फूट खाली कार कोसळली

  उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारी कार कोसळली, सुमारे 10 फूट खाली कोसळली कार, कारमधील तरुण सुखरूप बचावले, चौघे किरकोळ जखमी असल्याची माहिती

 • 20 Dec 2020 02:13 PM (IST)

  मुंबई महापालिकेच्या सर्वच 227 जागांवर आम्ही निवडणूक लढू – नसीम खान

  येत्या काळात काँग्रेस विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढणार, मुंबई काँग्रेसचे प्रचार प्रमुख नसीम खान यांची माहिती, गेल्या अनेक काळापासून शिवसेना-भाजपाकडे महापालिकेची सत्ता होती त्यामुळे रखडलेल्या कामावर प्रश्न उपस्थित होणारच. राज्य सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाही. त्यांना निधी मिळत नाही ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच सोनिया गांधींना हस्तक्षेप करावा लागला. मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. मला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मुंबई महापालिकेच्या सर्वच २२७ जागांवर आम्ही निवडणूक लढू

 • 20 Dec 2020 01:34 PM (IST)

  मातोश्रीजवळचा स्कायवॉक पाडावा लागला, कारण... : उद्धव ठाकरे

  आमच्या कलानगर जंक्शनला स्कायवॉक होता, तो पाडावा लागला, कारण नियोजन नव्हतं, भावी पिढ्यांचा विचार करुन कामं करा : उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:33 PM (IST)

  विकास दूरगामी परिणाम लक्षात घेऊन झाला पाहिजे : उद्धव ठाकरे

  मी जे आपल्याशी खोटे बोलणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल, असं कृत्य करणार नाही, विकास दूरगामी परिणाम लक्षात घेऊन झाला पाहिजे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:31 PM (IST)

  मी तुम्हाला श्रेय देतो, माझ्या इगोचा प्रश्न नाही : उद्धव ठाकरे

  विरोधीपक्षांना आवाहन, मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवा, मी तुम्हाला श्रेय देतो, माझ्या इगोचा प्रश्न नाही, तुमच्या इगोचाही असता कामा नये, जनतेच्या सेवेसाठी निवडणुकांमध्ये सत्ता मागतो : उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:29 PM (IST)

  राज्य आणि केंद्र सरकारने सामोपचाराने वाद मिटवावेत : उद्धव ठाकरे

  मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र सरकार कोर्टात, खेचाखेची करायची कशाला? बुलेट ट्रेनसारखे केंद्र सरकारचे प्रकल्प वादाविना सोडवा, शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारणं लोकशाही नाही, राज्य आणि केंद्र सरकारने सामोपचाराने वाद मिटवावेत : उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:25 PM (IST)

  मुंबईबाबत मी अहंकारी, मेट्रो कारशेडवरुन थयथयाट : उद्धव ठाकरे

  माझ्या मुंबईबाबत मी अहंकारी, महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी का नसावं? 30 हेक्टरमधील घनदाट झाडांची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरणार नाही, मेट्रोचे मार्ग ठरलेले आहेत, पीक आवर्समध्ये लोकल प्रमाणे मेट्रोच्या गाड्या जास्त लागतात, कमी गर्दीच्या वेळेत मेट्रो पार्क करणं (स्टेबलिंग लाईन) आवश्यक, पहिल्या प्रकल्पात स्टेबलिंग लाईन नव्हती : उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:23 PM (IST)

  कल्याणमध्ये बांगलादेशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  कल्याणमध्ये एका घरावर छापा टाकून ठाणे अॅन्टी ह्यूमन ट्रॅफिक सेलने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. धक्कादायक म्हणजे या घरामधून चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चारही महिला बांगलादेशी असल्याचे पोलिसांची माहिती, या चारही महिलांकडून मोहन बर्मन नावाचा देहव्यापार करुन घेत होता. माोहन बर्मनला अटक झाली आहे. नांदीवली परिसरात या बांगलादेशी महिला या परिसरात राहत होत्या. या मुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 • 20 Dec 2020 01:19 PM (IST)

  विकासकामांच्या आड आलेलो नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  विकास करत असताना नवनवीन गोष्टी येतात. विकासकामांच्या आड आलेलो नाही, मुंबईतील मेट्रोच्या कामांची पाहणी करायला जातोय, कामाची प्रगती बघतोय. कोस्टल रोड हे आमचं स्वप्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:16 PM (IST)

  केंद्राकडून धीम्या गतीने पैसे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. केंद्राकडून धीम्या गतीने पैसे येत आहेत, पण रडत बसलेलो नाही. नैसर्गिक आपत्तींचा सामना केला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:15 PM (IST)

  राजकीय आरोप सांभाळत सरकारची वर्षपूर्ती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  28 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. सरकार पडेल यासाठी अनेक जण डोळे लावून बसले होते. पण सरकारने कोरोनाचा धोका, राजकीय आरोप सांभाळत आणि विकास करत सरकारने एक वर्ष पूर्ण केलं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:10 PM (IST)

  नवीन वर्षाच्या स्वागताला काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  नवीन वर्षाच्या स्वागताला काळजी घ्या, लग्नात गर्दी वाढत आहे, फोटो काढताना मास्क काढला जातो, अंतर पाळा, सावधानता बाळगा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:08 PM (IST)

  परदेशातून येणाऱ्यांच्या टेस्ट थांबवण्यात येणार नाहीत : उद्धव ठाकरे

  युरोपातील देशांमध्ये चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. युरोपात कोरोनानं रुप बदललंय, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग वाढला, युरोपातील परिस्थितीवरुन शिकलं पाहिजे, परदेशातून येणाऱ्यांच्या टेस्ट थांबवण्यात येणार नाहीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:07 PM (IST)

  कोरोनाने अवतार बदलल्यामुळे युरोपमध्ये कडक लॉकडाऊन : उद्धव ठाकरे

  लस आल्यानंतरही मास्क बंधनकारक असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, युरोप-इंग्लंडमध्ये आजवरचा सर्वात कडक लॉकडाऊन, कोरोनाने अवतार बदलल्यामुळे ही वेळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 01:04 PM (IST)

  हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं कुटुंबप्रमुख म्हणून कर्तव्य, अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 • 20 Dec 2020 12:52 PM (IST)

  उद्धव ठाकरे यांचे जनतेला संबोधन, पाहा YouTube Live

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें