Maharashtra CM on Serum Institute Fire: ‘सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल: मुख्यमंत्री

सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (maharashtra cm uddhav thackeray visited serum institute of india pune fire)

Maharashtra CM on Serum Institute Fire: ‘सीरम’च्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल: मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 5:54 PM

पुणे: सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. (maharashtra cm uddhav thackeray visited serum institute of india pune fire)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, आदर पुनावाला, सायरस पुनावाला आणि आमदार चेतन तुपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आग कशामुळे लागली?, किती नुकसान झालं? बीसीजी लसी सुरक्षित आहेत का? आदींची माहिती घेतानाच आगीतील मृत कामगारांविषयीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या संकट काळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती. त्यामुळे सीरमला आग लागल्याचं कळताच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने जिथे लस तयार केली जाते तिथे हा प्रकार घडला नाही. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. सीरमच्या या नव्या इमारतीतील दोन मजले वापरात होते. तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार होतं. तिथेच ही दुर्घटना घडली, असंही ते म्हणाले.

या आगीमागे घातपात होता की अपघात होता, हे आताच सांगता येणार नाही. तसं बोलणंही योग्य ठरणार नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल, असंही ते म्हणाले. या दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांची जबाबदारी सीरमने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदतीचा हात देईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हजारो कोटींचं नुकसान

या दुर्घटनेत लसीचं नुकसान झालेलं नाही. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. रोटाव्हायरस आणि बीसीजीच्या लसीचं नुकसान झालं आहे. आगीत महत्त्वाच्या साहित्याचं नुकसान झालं आहे. पण सप्लाय लॉस झालेला नाही. मात्र हजारो कोटींचं नुकसान झालं आहे. आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे, असं आदर पुनावाला यांनी सांगितलं. भविष्यात आम्ही या इमारतीत कोरोनाची लस आणून ठेवणार होतो. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाचजणांचा होरपळून मृत्यू

पुण्यात मांजरी येथे कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला काल गुरुवारी भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीचा चौथा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृ्त्यू झाला होता. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार होते. (maharashtra cm uddhav thackeray visited serum institute of india pune fire)

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे आग भडकली

वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आणि तिथे इन्सुलिनचं भरपूर मटेरियल होतं. ज्याला ज्वलनशीलता असते. त्यामुळे ती आग वाढत गेली. महापालिकेचे 5 टँकर आणि तीन आणखी वाटर टँकर तात्काळ बोलावण्यात आले. संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे. आग विझवण्यासाठी दोन ते तीन तास लागलेत. आता पूर्णतः आग विझलेली आहे. सगळं आता नियंत्रणात आहे. संपूर्ण आग विझल्यानंतर लोकांनी आत जाऊन पाहिलं. त्या ठिकाणी पाच मृतदेह आढळून आलेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. (maharashtra cm uddhav thackeray visited serum institute of india pune fire)

संबंधित बातम्या:

Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आग पुन्हा भडकली, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

वेल्डिंगच्या कामामुळे सीरमच्या इमारतीला आग लागल्याची शक्यता : महापौर मुरलीधर मोहोळ

Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग, पाच जणांचा मृत्यू

(maharashtra cm uddhav thackeray visited serum institute of india pune fire)

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.