AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणीच्या श्रेयाचा वाद कायम? ओवाळणी म्हणून मतांची परतफेड होईल का?

लाडक्या बहिणींवरुन श्रेयवादाचा सिलसिला कायम असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र भाजपनं वर्तमानपत्रात जाहिराती देत लाडक्या बहिण योजनेचं कौतूक केलं. पण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्द, तर जळगावातल्या पोस्टरवरुन अजित पवारांचा फोटो गायब होता.

लाडक्या बहिणीच्या श्रेयाचा वाद कायम? ओवाळणी म्हणून मतांची परतफेड होईल का?
| Updated on: Oct 15, 2024 | 10:39 PM
Share

महायुती सरकारनं प्रचारात सर्वाधिक भर ज्या लाडकी बहीण योजनेवर दिला आहे. त्यावरुन अद्यापही श्रेयवादाचा सिलसिला थांबलेला नाही. याआधी अजित पवार आपल्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नाव मुख्यमंत्री शब्द वगळून करत होते. त्यानंतर आता महाराष्ट्र भाजपनं विविध वर्तमानपत्रांत दिलेल्या जाहिरातीतही मुख्यमंत्री शब्द गायब असून महायुती आणि फडणवीसांचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. भाजपच्या जाहिरातीत आधार लाडक्या बहिणीला, आशीर्वाद महायुतीला. महायुती शासित महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी असं म्हणत 4 हफ्ते जमा झाल्याचा उल्लेख आहे. मात्र यातून योजनेतील नावाचा मुख्यमंत्री शब्द गायब आहे.

दुसरीकडे जळगावात भाजपनंच लावलेल्या लाडकी बहिणीच्या बॅनरमध्येही फडणीस-शिंदेंचा फोटो असून तिथून अजित पवारांचा फोटो हटवण्यात आला आहे, शिवाय या बॅनरवर शिंदेंचा फोटो असला तरी योजनेतील मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेच्या श्रेयाचा वाद रंगल्यानंतर अजित पवारांच्या कार्यक्रमातल्या बॅनरमध्ये बदल झालेला दिसतोय. याआधी फक्त लाडकी बहिण योजनेचे बॅनर होते. ते आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना म्हणून झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना विद्यमान सरकारला बेकायदेशीर म्हणत असलं., तरी त्याच सरकारच्या जाहिराती मात्र सामनातल्या वर्तमानपत्रातही छापून येत आहेत. त्यावरुन भाजपनं ठाकरे गटाला सवाल केलाय.

घटना बाह्य सरकार म्हणायचं आणि त्याच सरकारची सामनाच्या पहिल्या पेज वर जाहिरात लावायची आणि पैसे घ्यायचे कितीही शेमड्या सारखे रडलात तरी तुम्ही थांबवू शकत नाही अशी टीका केली आहे. दरम्यान भाजपच्या जाहिरातीत तेलंगणा, हिमाचल आणि कर्नाटकात काँग्रेसनं लाडक्या बहि‍णींना आश्वासन देवून फसवल्याचा दावा करत काँग्रेसवर भूमिकेवर सवाल केलाय. विरोधकांनी मात्र या दाव्यांना खोटं ठरवलं आहे.

लाडक्या बहिण योजनेतून सरकारनं बहि‍णींना दिलेल्या ओवाळणी मतांची परतफेड करेल का, हे निकालच ठरवणार आहे. पण या घडीला महागाई आणि लाडकी बहिणीवरुन लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.