Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगली जिल्हा आता तिसऱ्या स्तरात, सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहणार

कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : सांगली जिल्हा आता तिसऱ्या स्तरात, सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहणार
CORONA

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 11 Jun 2021 22:25 PM (IST)

  मुंबईत लेव्हल 3 चे निर्बंध कायम, महापालिकेचा निर्णय जारी

  मुंबईत लेव्हल 3 चे निर्बंध कायम, महापालिकेचा निर्णय जारी

  मुंबईचा पॉझिटीव्हिटी दर ४.४० तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर २७.१२% आहे,

  आकडेवारीनुसार मुंबई लेव्हल २ मध्ये गेली असली तरी मुंबईत लेव्हल ३ चे निर्बंध कायम राहणार

  कारणे :

  मुंबईतील लोकसंख्या घनतेचे प्रमाण जास्त

  लोकलमधील गर्दी, एमएमआर परिसरातून मोठ्या संख्येनं मुंबईत येणारे प्रवासी

  हवामान विभागानं मुंबईला दिलेला अतिवृष्टीचा इशारा

  त्यामुळे, पुढील सूचना येईपर्यंत सध्याचे निर्बंध कायम राहतील

 • 11 Jun 2021 22:22 PM (IST)

  सांगली जिल्हा आता तिसऱ्या स्तरात, सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहणार

  सांगली :

  कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात

  स्तरानुसार जिल्ह्यात 14 जून पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहीती

  अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार

 • 11 Jun 2021 21:41 PM (IST)

  राज्यात दिवसभरात 11 हजार 766 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 406 जणांचा मृत्यू

  आज राज्यात 11766 जणांना कोरोना
  आज राज्यात डिस्चार्ज 8104 जणांना
  आज राज्यात 406 जणांचा मृत्यू

 • 11 Jun 2021 20:40 PM (IST)

  अकोला जिल्ह्यात दिवसभरात 43 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दोघांचा मृत्यू

  अकोल्यात कोरोना अपडेट :

  अकोल्यात आज दिवसभरात 43 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे.

  आतापर्यंत 1108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 54185 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

  सध्या 1740 रुग्ण उपचार घेत आहेत.

  दिवसभरात 262 जण कोरोनामुक्त झाले आहेत

 • 11 Jun 2021 20:38 PM (IST)

  सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 941 नवे कोरोनाबाधित रुग्ण

  सांगली कोरोना / म्युकर अपडेट –

  जिल्ह्यात आज दिवसभरात 941 कोरोना रुग्ण

  म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 238 , आज आढळलेले रुग्ण 5

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 23 रुग्णाचा मृत्यू

  जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3694 वर

  ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 9055 वर

  तर उपचार घेणारे 992 जण आज कोरोना मुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 115630 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 128379 वर

 • 11 Jun 2021 20:37 PM (IST)

  पालघर जिल्ह्यात निर्बंधात आणखी शिथिलता

  पालघर : जिल्ह्यात ब्रेक द चेन काळात लादलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता. पालघरमध्ये 14 जूनपासून निर्बंधांमध्ये शिथिलताचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानंही आता दिवसभरासाठी राहतील खुली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ४.४३ टक्के झाल्याने लेवल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंधात शिथिलता . पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळे यांच्याकडून नवीन नियमावली जारी. मॉल्स  सिनेमागृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू. विवाह समारंभासाठी हॉलच्या 50 टक्के क्षमतेने तर जास्तीत जास्त 100 व्यक्तींना परवानगी. सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू. मात्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्ण संख्येत घट झाल्याने नागरिकांना दिलासा.

 • 11 Jun 2021 20:19 PM (IST)

  नागपुरात दिवसभात 89 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर :
  नागपुरात आज 89 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  191 जणांनी केली कोरोनावर मात

  तर 7 जणांचा कोरोना मुळे मृत्यू

  एकूण रुग्ण संख्या – 476268

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 465026

  एकूण मृत्यू संख्या – 8995

 • 11 Jun 2021 20:15 PM (IST)

  पीएम केअर फंडातील 60 व्हेंटिलेटर नाशिक महापालिका परत करणार

  नाशिक :

  पीएम केअर फंडातील 60 व्हेंटिलेटर महापालिका परत करणार

  व्हेंटिलेटर इंस्टॉल करून देण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीनं व्हेंटिलेटर इन्स्टॉल करून सुरळीत सुरू करून न दिल्यास ते परत करणार

  नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा इशारा

  पीएम केअर फंडातून आलेले 60 व्हेंटिलेटर इन्स्टॉलेशन अभावी बिटको रुग्णालयात धूळ खात पडून

  पीएम केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जा बाबत संशय

 • 11 Jun 2021 18:59 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 239 नवे कोरोनाबाधित, 367 रुग्णांना डिस्चार्ज

  पुणे :
  – दिवसभरात २३९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात ३६७ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत १९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ११.
  – ५१९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७३५३९.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३३२०.
  – एकूण मृत्यू -८४५६.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६१७६३.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६०७६.

 • 11 Jun 2021 18:01 PM (IST)

  पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका वाढला, जून महिन्यात दहा दिवसात 192 रुग्ण

  पुणे :

  पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका वाढला

  जून महिन्यात १० दिवसात १९२ रुग्ण

  आत्तापर्यंत जिल्ह्यात ९६८ म्युकर मायकोसीस रुग्ण आढळले

  तर तब्बल ९० जणांचा मृत्यू

  पुणे शहर हद्दीत सर्वाधिक ४०६ रुग्ण

  २४२ रुग्ण म्युकर मायकोसीसमधून बाहेर

  तर ६३६ जणांवर अजूनही विविध रुग्णालयात उपचार सुरु

 • 11 Jun 2021 17:57 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 59 नवे रुग्ण, 97 जणांना डिस्चार्ज

  वाशिम :

  जिल्ह्यात आज 59 नवे रुग्ण आढळले तर आज 97 जणांना देण्यात आला डिस्चार्ज, तसेच एका रुग्णाचा मृत्यू

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40960

  सध्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 735

  आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 39627

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 597

 • 11 Jun 2021 17:13 PM (IST)

  जीबीएस व्हायरसमुळे फलटण येथील युवकाचा मृत्यू

  सातारा:

  जीबीएस व्हायरसमुळे फलटण येथील युवकाचा मृत्यू

  आसु येथील युवकाला कोरोनानंतर जीबीएस व्हायरसची लागण झाली होती

  पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान युवकाचा मृत्यू

  कोरोनाच्या उपचारानंतर युवकाला अशक्तपणा वाढल्याने पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले होते

  जीबीएस आणि कोरोना व्हायरसचा काहीही संबध नसल्याचा जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये यांची माहिती

 • 11 Jun 2021 16:48 PM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात दिवसभरात फक्त 16 नवे कोरोनाबाधित, पॉझिटिव्ह रुग्णांत मोठी घसरण

  गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून प्रत्येक दिवशी 500 बाधित रुग्ण आढळत होते. पण या दहा दिवसात गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी पॉझिटिव्ह रुग्णांची घसरण झालेली आहे.

  गडचिरोली जिल्हयात दिवसभरात 16 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 69 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29845 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 28736 वर पोहचली. तसेच सद्या 376 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 733 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

 • 11 Jun 2021 10:22 AM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित पुण्यातील कौन्सिल हॉल येथे कोरोना आढावा बैठक सुरू

  पुणे

  – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित पुण्यातील कौन्सिल हॉल येथे कोरोना आढावा बैठक सुरू

  – बैठकीस प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित

  – शहर अनलॉक केल्यानंतर पहिली बैठक

  – रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता की निर्बंध कठोर केले जाणार याकडे लक्ष

 • 11 Jun 2021 10:21 AM (IST)

  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोव्हिड आढावा संदर्भात बैठक घेणार

  आज मुख्यमंत्र्यांची कोविड आढावा संदर्भात बैठक

  औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागातील सरपंचांशी करणार संवाद

  वर्षा निवासस्थानाहून दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार बैठक

  दुपारी 3.30 वाजता होणार बैठक

 • 11 Jun 2021 10:18 AM (IST)

  खामगावतील कोव्हिड जैविक कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट

  बुलडाणा

  खामगावतील कोव्हिड जैविक कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट

  जैविक कचरा चक्क नगर परिषदेच्या घंटा गाडीत

  डम्पिंग ग्राउंडवर जैविक कचऱ्याची विल्हेवाट

  आरोग्य विभागाने काढल्या डॉक्टरांना नोटिसा

  नगरपरिषद मुंख्याधिकाऱ्यांनाही नोटीस, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

 • 11 Jun 2021 09:30 AM (IST)

  औरंगाबादेत म्युकरमायकोसिसची गंभीर परिस्थिती असतानाही उपचारासाठी मिळेनात इंजेक्शन

  औरंगाबाद –

  म्युकरमायकोसिसची गंभीर परिस्थिती असताना ही उपचारासाठी मिळेनात इंजेक्शन..

  मागील 24 तासात मिळाले नाही एकही इंजेक्शन..

  औरंगाबादेत 300 काळ्या बुरशीच्या रुग्णांवर उपचार सुरू..

  अँफोटेरेसिन लिपोसोमलचे एकही इंजेक्शन उपलब्ध नाही..

  औरंगाबादेत काळी बुरशीची गंभीर परिस्थिती तर औषधींचा तुटवडा..

  104 मृत्यू झालेले असतानाही इंजेक्शन उपलब्ध नाही

 • 11 Jun 2021 09:09 AM (IST)

  अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांच्या उपचारासाठी वापरलेले इंजेक्शन आता औरंगाबादेत

  औरंगाबाद

  अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपचारासाठी वापरले इंजेक्शन आता औरंगाबादेत

  औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणार..

  अँटिबॉडी कॉकटेल नावाचे इंजेक्शन होणार शनिवार पर्यंत औरंगाबादेत दाखल..

  घाटी रुग्णालयांस मिळणार 750 डोस..

  अँटिबॉडी कॉकटेल नावाचे नवे इंजेक्शन रुग्णांच्या सेवेत होणार दाखल

 • 11 Jun 2021 09:06 AM (IST)

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक स्वरूपात आषाढी एकादशी वारी करण्याचा सोलापूर जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव

  सोलापूर– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक स्वरूपात आषाढी एकादशी वारी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव

  जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला प्रस्ताव

  22 जुलैला आहे आषाढी एकादशी

  आषाढी एकादशीच्या जवळपास तीन आठवडे अगोदर राज्यभरातील महत्त्वाच्या दिंडी आणि पालख्यांचा सुरू होतो वारी मार्ग

  मागच्या वर्षी धोरणाच्या प्रादुर्भावामुळे झाली नाही आषाढी वारी आणि कार्तिकी वारी

  वारीला परवानगी दिल्यास कोरोनाचा  प्रादुर्भाव झपाट्याने प्रादुर्भाव होईल अशी भीती प्रशासनाला

  त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने प्रतीकात्मक वारी व्हावी अशी प्रशासनाची भूमिका

  पुढील आठवड्यापर्यंत विभागीय आयुक्त घेणार निर्णय

 • 11 Jun 2021 09:05 AM (IST)

  औरंगाबादेत लसीकरणाकडे नागरीकांनी फिरवली पाठ

  औरंगाबाद –

  औरंगाबादेत लसीकरणाकडे नागरीकांनी फिरवली पाठ..

  महानगरपालिकेकडे कोविशील्ड 35000 डोस पडून ..

  नागरिकांमध्ये वाढले गैरसमज तर समुपदेशनाअभावी लस घेणाऱ्यांचे प्रमाण घटले..

  45 दिवसांच्या ऐवजी 84 दिवसांच्या विलंबामुळे लस घेणाऱ्यांचे प्रमाण ढासळले..

  केंद्रांवरील आरोग्य कर्मचारी आता लस घेण्यासाठी येणाऱ्यांची पाहतायत वाट

 • 11 Jun 2021 07:43 AM (IST)

  रायगड जिल्ह्यात काल दिवसभरात एकुण 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू 

  रायगड

  जिल्ह्यात काल दिवसभरात एकुण 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू

  एकुण नविन रुग्ण 561 तर बरे झालेले रुग्ण 546

  आत्ता पर्यंत जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची सख्यां 1,36,630

  काल दिवसभरात दाखल रुग्ण व बरे झालेले रुग्णांमध्ये मोठा फरक नसल्याने समाधान व्यक्त केले जाते

 • 11 Jun 2021 07:01 AM (IST)

  बीडमध्ये ‘म्युकरमायकोसिस’मुळे आठ रुग्णांनी एक डोळा गमावला

  बीड –

  जिल्ह्यत आतापर्यंत 144 रुग्ण आढळले असून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्वद रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारामुळे तब्बल आठ जणांना आपला एक डोळा गमवावा लागला. सतरा रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 • 11 Jun 2021 06:59 AM (IST)

  महाराष्ट्र लसीकरणात अव्वल

  मुंबई :

  राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले

  विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक

  एवढ्या मोठ्या प्रमाणातलसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो

 • 11 Jun 2021 06:56 AM (IST)

  ‘म्युकरमायकोसिस’वरील औषधाच्या अपुऱ्या पुरवठ्यावर न्यायालयाचा संताप

  मुंबई –

  राज्यात गेल्या 36 तासांत म्युकरमायकोसिसच्या 82 रुग्णांचा मृत्यू झाल्याची व रुग्णसंख्या सर्वाधिक असतानाही ‘अ‍ॅम्फोटेरसीन-बी’ या इंजेक्शनचा केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पुरेसा पुरवठा होत नसल्याची उच्च न्यायालयाने गुरुवारी गंभीर दखल घेतली. तसेच या इंजेक्शनअभावी म्युकरमायकोसिसच्या रूग्णाचा मृत्यू व्हायला नको, असेही न्यायालयाने यावेळी केंद्र सरकारला बजावले

 • 11 Jun 2021 06:55 AM (IST)

  71 हजार रिक्षाचालकांच्या खात्यात अनुदान जमा

  मुंबई –

  निर्बंध काळात परवानाधारक रिक्षाचालकांचे बुडलेले उत्पन्न काही प्रमाणात भरून काढण्यासाठी त्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा करण्याच्या निर्णयानुसार आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत, तर सुमारे ७१ हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली

 • 11 Jun 2021 06:53 AM (IST)

  जगभरात 8 लशी कोरोना विषाणू रोखण्यासाठी ठरताहेत प्रभावी

  विकसित देशात दररोज लाखो लोकांचं लसीकरण होतं आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत ८ लशींची मात्रा प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.