Corona Cases and Lockdown News LIVE : मीरा भाईंदरमध्ये 462 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, 9 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Apr 17, 2021 | 6:17 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : मीरा भाईंदरमध्ये 462 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, 9 रुग्णांचा मृत्यू
भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूने शिरकाव केलाय. हा विषाणू ट्रिप म्युटंट असल्याचं समोर आलंय. त्याचाच परिणाम म्हणून देशभरात कोरोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या नव्या कोरोना विषाणूचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. महाराष्ट्रात नुकत्याच गेलेल्या जीनोम सिक्वेंसिंगमधून या नव्या विषाणूची आकडेवारी समजलीय. यानुसार नव्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 60 टक्के रुग्ण या नव्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Apr 2021 11:56 PM (IST)

    मीरा भाईंदरमध्ये 462 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, 9 रुग्णांचा मृत्यू

    मीरा भाईंदर कोरोना अपडेट

    मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यू संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. आज 462 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत 37 हजार 042 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 32 हजार 116 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 4 हजार 032 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत 894 रुग्णांचा मृत्यू झाला आहे..

  • 16 Apr 2021 10:49 PM (IST)

    उस्मानाबादेत दिवसभरात 580 नवे कोरोनाबाधित तर 23 जणांचा मृत्यू

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 580 रुग्ण व 23 मृत्यू तर 291 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 300, तुळजापूर 39,उमरगा 68, लोहारा 26, कळंब 58, वाशी 36, भूम 20 व परंडा 33 रुग्ण

    24 मार्च – 176 25 मार्च – 174 26 मार्च – 155 27 मार्च – 224 28 मार्च – 184 29 मार्च – 239 30 मार्च – 242 31 मार्च – 253 01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613 15 एप्रिल – 764 16 एप्रिल – 580

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 5696 अॅक्टिव्ह रुग्ण

    उस्मानाबाद – 1 लाख 84 हजार 449 नमुने तपासले त्यापैकी 28 हजार 424 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 21.67 टक्के

    22 हजार 037 रुग्ण बरे 78.82 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 691 तर 2.37 टक्के मृत्यू दर

  • 16 Apr 2021 09:07 PM (IST)

    ठाणे महानगरपालिका हद्दित दिवसभरात 1410 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 1484 वर

    ठाणे महानगरपालिका कोरोना अपडेट

    # आज 1,876 रुग्ण कोरोनातून बरे

    # आज 1,410 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 1,03,256 वर

    #  पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या 85,770 वर

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84%  टक्के

    # 16,002 रुग्णांवर उपचार सुरु

    # आज दिवसभरात 9 जणांचा मुत्यू झाला

    आतापर्यंत एकूण  1,484 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 16 Apr 2021 08:44 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 883 नवे कोरोना रुग्ण

    सांगली कोरोना अपडेट

    जिल्ह्यात आज दिवसभरात 883 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 15 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील मृतांचा आकडा 1904 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 6025 वर

    उपचार घेणारे 371 जण आज कोरोनामुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 51374 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 59303 वर

  • 16 Apr 2021 08:42 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 2529 नवे रुग्ण

    पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट

    नवे कोरोना रुग्ण -2529

    कोरोनामुक्त -2872

    मृत्यू -54

    एकूण कोरोना रुग्ण -177934

    एकूण कोरोनामुक्त -153610

    एकूण मृत्यू -2317

  • 16 Apr 2021 08:35 PM (IST)

    चंद्रपुरात दिवसभरात 1135 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    चंद्रपूर: गेल्या 24 तासात 4248 नमुने तपासणीतून 1135 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 7 जणांचा मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 39054

    एकूण कोरोनामुक्त : 29554

    सक्रिय रुग्ण : 8948

    एकूण मृत्यू : 552

    एकूण नमूने तपासणी : 320367

  • 16 Apr 2021 08:29 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 5373 कोरोना रुग्णांची वाढ, 5049 रुग्णांना डिस्चार्ज  

    पुणे कोरोना अपडेट

    - दिवसभरात 5373 कोरोना रुग्णांची वाढ

    - दिवसभरात  5049 रुग्णांना डिस्चार्ज

    - पुण्यात 65 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, 14 रूग्ण पुण्याबाहेरील

    -  1196 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या  354797 वर

    - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या-  54624

    - एकूण मृत्यू -6002

    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज  294171 जणांना डिस्चार्ज

  • 16 Apr 2021 08:11 PM (IST)

    वसई विरारमध्ये दिवसभरात 784  नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

    वसई विरार कोरोना अपडेट

    - वसई विरारमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे

    - मागच्या 24 तासात 784  नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत

    दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 367 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    वसई विरार महापालिकेत आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 42 हजार 404 वर पोहोचली आहे.

    आतापर्यंत एकूण 952 जणांचा मृत्यू झाला आहे

    कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 34 हजार 42 वर

    कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची  संख्या 7 हजार 410

  • 16 Apr 2021 07:05 PM (IST)

    चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी- अजित पवार

    अजित पवार माध्यमांशी संवाद साधत आहेत. देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तशीच स्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आगामी काळात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, औषधांची, बेड्सची, ऑक्सिजनची, रेमेडिसिव्हीरची कमतरता कशी भासणार आहे, याबाबत प्रयत्न सुरु आहे. रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचित केली. अंबानी यांनी काही प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध करुन देण्याचे कबूल केले आहे.

    आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निधीची कमतरता पडता कामा नये.  जवळपास  मुख्यमंत्र्यानी साडे पाच कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यापैकी 3300 कोटी रुपये कोरोनाच्या कामासाठी खर्च करण्यासाठी परवागनी देण्यात आली आहे. कोरोनाविरोधात लढण्याासाठी राज्यातील सर्व मतदारसंघात एकूण 350 कोटी रुपये खर्च करण्यासाठी तत्काळ मान्यता देण्यात  आली आहे.

    ससून रुग्णालयात मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट बेड वाढवलेले आहेत. माझी डॉक्टरांना विनंती आहे . आपण ससून रुग्णालय हे कायमस्वरुपी कोव्हिड रुग्णालय बनवणार नाहीत. डॉक्टरांच्या काही मागण्या आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या काही मागण्या असतील तर सरकार म्हणून आम्ही त्यामध्ये लक्ष घालू मात्र, डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं तर सरकारला सुद्धा कठोर निर्णय घ्यावा लागेल. डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेऊ नये, अशी मी विनंती करतो. डॉक्टरांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अशी मी विनंती करतो.

    दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आम्ही कठोर निर्णय घेतला आहे. रुग्ण वाढल्यामुळे असे निर्णय घेण्याची वेळ आली. याला सर्वांनी व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही. तर मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल. त्यामुळे तशी वेळ येऊ देऊ नये अशी आम्ही विनंती करतो.

    आरोग्य यंत्रणा जीवाचं राण करतेय. डॉक्टर दिवसरात्र मेहनत करत आहेत. चतुर्थ आणि त्रितिय श्रेणी कर्मचारी यांना रिक्रुट करण्यासाठी परवानगी दिली आहे. एमबीबीएस डॉक्टर जेवढे मिळायला हवेत ते मिळत नाहीयेत. कुंभमेळा, गॅदरिंग यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. यावेळचा कोरोना लोकांना लवकर कव्हर करतो आहे. त्यामुळे कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त झाल्याचे दिसत आहे.

  • 16 Apr 2021 06:45 PM (IST)

    नागपुरात कोरोनामुळे दिवसभरात 75 जणांचा मृत्यू, 6194 नव्या रुग्णांची नोंद

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज पुन्हा कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू

    दिवसभरात 6194 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    दिवसभरात 5894 जणांची कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या - 309043

    रुग्ण बरे होण्याची संख्या - 238599

    एकूण मृत्यू- 6109

  • 16 Apr 2021 06:41 PM (IST)

    खोपोलीमध्ये उद्यापासून तीन दिवसांसाठी जनता कर्फ्यु 

    रायगड :उद्यापासून तीन दिवसांसाठी खोपोलीमध्ये जनता कर्फ्यु

    मेडिकल, रुग्णालय आणि दूध विक्री सुरु ठेवणार

    नगराध्यक्ष औसरमल यांच्या उपस्थीत सतत तीन दिलस चाललेल्या बैठकिनतंर निर्णय

    माजी नगराध्यक्ष मसुरकर, उपनगराध्य विनीता कांबळे तसेच सर्व नगरसेवक, व्यापारी, भाजीपाला फळ मार्केटचे प्रतिनीधी, रिक्षा चालक सघंटना  बैठकीला उपस्थीत

  • 16 Apr 2021 06:37 PM (IST)

    ठाणे महानगरपालिका 2 ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणार 

    ठाणे : मुंबई महानगरपालिके नंतर ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग

    ऑक्सिजनचा पुरवठा अविरत सुरू ठेवण्यासाठी 2 ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प पालिका उभारणार

    या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून 20 टन प्राणवायूची निर्मिती होणार

    हे प्रकल्प 30 एप्रिलपर्यंत कार्यान्वित करण्याचे पालिकेचे प्रयत्न

    या प्रकल्पातून 24 तासात 175 सिलिंडर प्राणवायू निर्माण होणार आहे

    सध्या ठाणे कोव्हिडी हॉस्पिटल म्हणजे ग्लोबल कोव्हिड सेंटरमध्ये 20 टन तर पार्किंग प्लाझा रुग्णालयात 13 टन प्राणवायूची गरज आहे

    काही दिवसापूर्वी ऑक्सिजन कमी पडल्याने पार्किंग प्लाझा इथल्या रुग्णांना ग्लोबल कोव्हिड हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्याची आली होती नामुष्की

  • 16 Apr 2021 05:36 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात 569 नवे रुग्ण, एकूण 221 जणांचा मृत्यू 

    वाशिम कोरोना अपडेट

    जिल्ह्यात  पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज पुन्हा 5 रुग्णांचा मृत्यू

    आज एकाच दिवशी आढळले 569 नवे रुग्ण

    तर 269 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 21174

    सध्या सक्रिय रुग्णांची संख्या – 3373

    आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 17569

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 221

  • 16 Apr 2021 05:35 PM (IST)

    एअर ऑक्सिजन जनरेटर प्लांट उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल, रोज 64 जम्बो सिलिंडर तयार होणार

    उस्मानाबाद : जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी असून एअर ऑक्सिजन जनरेटर प्लांट जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. आता उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात हवेतील ऑक्सिजनचे मेडिकल ऑक्सिजनमध्ये रुपांतर होणार आहे. त्यामुळे रोज 64 जम्बो सिलिंडर तयार होणार आहेत. ही यंत्रणा आगामी 3 दिवसात कार्यान्वित होणार असून जिल्हाधिकारी दिवेगावकरांनी त्याची पाहणी केली आहे.

    हवेतील ऑक्सिजन गोळा करण्याच्या युनिटची किंमत 65 लाख असून प्रति मिनिट 300 लिटर ऑक्सिजन गोळा होणार आहे त्यामधून 64 जंबो सिलेंडर भरले जातील. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत हाताळन्यासाठी हवेतील गोळा होणारा ऑक्सिजन मेडिकलमध्ये मेडिकल ऑक्सिजन मध्ये कन्व्हर्ट करून 64 जम्बो सिलेंडर भरले जाणार असून तो रुग्णांना दिला जाणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे हे युनिट तातडीने सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनकडून मिळाली आहे

  • 16 Apr 2021 05:32 PM (IST)

    गडचिरोलीमध्ये दिवसभरात 11 जणांचा मृत्यू, 434 नवे रुग्ण

    गडचिरोली : आज जिल्हयात 434 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 183 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 14019 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11249 वर पोहचली. तसेच सध्या येथे 2585 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयात आतापर्यंत एकूण 185 जणांचा  कोरोनामुळे मृत्यू.

  • 16 Apr 2021 04:54 PM (IST)

    अमरावती जिल्हात आज 680 नवे कोरोना पॉझिटिव्ह, सध्या 4164 जणांवर उपचार सुरु 

    अमरावती कोरोना अपडेट

    अमरावती जिल्हात आज 680 नवे कोरोना पॉझिटिव्ह

    -तीन रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू

    -आज 102 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    -जिल्हात आतापर्यंत 55177 जण कोरोना पॉझिटिव्ह

    -जिल्हात आतापर्यंत 50261 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    -जिल्हात 752 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू

    जिल्हात सध्या 4164 रुग्णांवर उपचार सुरू

  • 16 Apr 2021 04:42 PM (IST)

    पुण्यात ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर

    पुणे : ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार

    - आपल्या विविध मागण्यांसाठी हा संप असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु असणार

    - पुण्यात कोरोनाबधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना प्रशासनाने ससून रुग्णालयात 300 बेड्स वाढवण्याचा निर्णय घेतलाय

    - बेड्स वाढवलेत मात्र रुग्णालयातील मनुष्यबळ वाढवण्यात आले नाहीय

    डॉक्टरांचा विविध मागण्यासांठी संप

  • 16 Apr 2021 04:25 PM (IST)

    पुण्यात कोरोना चाचण्यांचा रिपोर्ट यायला 3 ते 4 दिवस, मृत्यूदर वाढण्याची शक्यता

    पुणे : 13 एप्रिलला चाचणी करूनही नागरिकांना अजून रिपोर्ट नाही

    शासकीय चाचणीचा रिपोर्ट यायला लागतायेत तीन ते चार दिवस

    दिवसाला अवघ्या 2 हजार चाचण्या होऊनही रिपोर्ट येण्यास तीन दिवसांचा कालावधी

    रिपोर्ट वेळेत मिळत नसल्यानं तीव्र लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचारास विलंब

    रुग्णांना चाचणी वेळेत न केल्यामुळे मृतूदर वाढण्याची शक्यता

    शहरात पालिकेच्या चाचण्यांमध्ये मोठा गोंधळ

  • 16 Apr 2021 03:50 PM (IST)

    सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोनामुक्त, 5 दिवस गृह विलगिकरणात राहावं लागणार

    नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केली कोरोनावर मात

    भागवत यांना आज डिस्चार्ज मिळणार

    9 एप्रिल रोजी  मोहन भागवत यांची कोरोना चाचणी आली होती पॉझिटिव्ह.

    नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारानंतर सर्व चाचणीचे रिपोर्ट समाधान कारक असल्याने भागवत यांना डिस्चार्ज

    पुढील 5 दिवस त्यांना राहावं लागणार गृह विलगिकरणात

  • 16 Apr 2021 03:31 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यात नियमात आणखी कठोरता, अत्यावश्यक सेवा 7 ते दुपारी 2 वाजतापर्यंतच सुरु राहणार

    - वर्धा जिल्ह्यात नियमात आणखी कठोरता

    - वर्धा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांच्या वेळात बदल

    - उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजतापर्यंतच सुरू असणार अत्यावश्यक सेवा

    - वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा नियमित सुरू राहणार

    - खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट येथून पार्सल सेवा

    दूध केंद्र, दूध घरपोच वितरण  सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार

    - किराणा, भाजीपाला, फळ विक्री आदी सेवा सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतच मिळणार

    - अत्यावश्यक सेवेच्या नावावर नागरिकांची बाजारात होत होती गर्दी

    गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

  • 16 Apr 2021 03:29 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक, बैठकीला प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार

    पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

    - बैठकीत पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रदुर्भावाचा आढावा घेतला जाणार

    - शिवाय रेमेडीसिव्हीरचा तुटवडा आणि बेड्सची कमतरता यावर बैठकीत चर्चा होणार

    - तसेच राज्य सरकारच्या निर्बंधाबाबत अजित पवार आढावा घेणार आहेत.

    - बैठकीला जिल्हाधिकारी, दोन्ही पालिकेचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त उपस्थित रहाणार,

    - थोड्याच वेळात सुरू होणार बैठक

  • 16 Apr 2021 03:18 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मध्य प्रदेशातील नागरिकांना निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट दाखवणे बंधनकारक

    अमरावती : जिल्ह्यात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

    रुग्ण नियंत्रित करण्यासाठी मध्य प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांना आता निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट आणणे आवश्यक

    त्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

    जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती

  • 16 Apr 2021 03:13 PM (IST)

    रेमेडेसिव्हीर उपयोगाच्या बाबतीत प्रोटोकॉल पाळले जात नाहीयेत- राजेंद्र शिंगणे

    अन्न आणि औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे हे पत्रकारांशी संवाद साधत आहेत. ज्या रुग्णांना रेमेडीसिव्हीरची गरज आहे, त्यांना पुवण्याचा आमचा प्रयत्न आहे. रेमेडेसिव्हीरचा वापर कसा करायचे हे अनेकजण सांगत आहेत. मात्र त्याबद्दलचा प्रोटोकॉल पाळला जात नाहीये. आजच्या परिस्थितीत प्रत्येक कंपनीचे प्रोडक्शन वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण प्रोडक्शन वाढलं तर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात लस निर्मिती करण्याची मागणी केली होती. त्याची परवानगी दिली आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानावे लागतील, असे राजेंद्र शिंगणे म्हणाले.

  • 16 Apr 2021 02:07 PM (IST)

    कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा खेळ फसला

    उस्मानाबाद -

    कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा खेळ फसला

    मृत्यूनंतर तपासणीत कोरोनाबाधीत रुग्ण निगेटिव्ह आणि अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा पॉझिटिव्ह

    नातेवाईकांनी आक्षेप घेताच अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा मयत पॉझिटिव्ह

    जिल्हा शासकीय रुग्णालयातील केस पेपर टीव्ही 9 च्या हाती

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले चौकशीचे आदेश

  • 16 Apr 2021 01:47 PM (IST)

    आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात लसींचा तुटवडा

    आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, कोव्हिड 19 लसीचा साठा संपला असुन औषधी व लस साहित्य भांडार मध्ये कोविशील्डची एकही लस सध्या शिल्लक नाही तर कोव्हॅक्सिनच्या फक्त शंभरच लसी शिल्लक आहे. तर लसीकरण केंद्रावर आज असलेला साठा संपल्यास उद्यापासून जिल्ह्यातील सर्व कोव्हिड लसीकरण बंद पडणार असल्याची शक्यता आहे.

  • 16 Apr 2021 12:07 PM (IST)

    ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड, एका बेडवर 2-3 रुग्णांवर उपचार सुरु

    पुणे -

    ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड

    एका बेडवर 2 ते 3 रुग्णांवर उपचार सुरु

    ससून मध्ये बेडची कमतरता

    ससून मध्ये नवीन इमारतीत बेड उपलब्ध असूनही तिथल्या बेडचा वापर नाही

  • 16 Apr 2021 11:48 AM (IST)

    ससूनमधील निवासी डॉक्टर आज रात्री पासून संपावर जाणार

    पुणे

    ससूनमधील निवासी डॉक्टर आज रात्री पासून संपावर जाणार

    विविध मागण्यांसाठी जाणार संपावर

    मुख्य मागणी तातडीने बेड सोबत मनुष्यबळ वाढवा ही मागणी

    1)मनुष्यबळाशिवाय बेड वाढवल्यामुळे पेशंट च उपचाराच व्यवस्थापन कोलमडून जाईल.

    2)बेड तर तयार करण्यात येतील पण त्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ,सुविधा प्रशासनाकडे आहेत का?

    3)दुसऱ्या लाटेची कल्पना डिसेंबर 2020 ला च आली असताना शासनाकडून कोणतीही पूर्वतयारी केली गेली नाही

    4)कोव्हिड ड्युटी करणाऱ्या डॉक्टर्सला क्वॉरन्टाईन, विलगीकरणाची सुविधा नाही त्यामुळे आमचे 80 निवासी डॉक्टर्स एका महिन्यात कोरोनाने संक्रमित झाले

    5)आम्ही दीड महिन्यापासून प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजना साठी विनंती करत असून त्या वर कोणतेही उपाय केले गेले नाहीत

  • 16 Apr 2021 11:35 AM (IST)

    कोल्हापुरात पती-पत्नीची मुलासह आत्महत्या, कुंभी नदीपात्रात मृतदेह सापडले

    कोल्हापूर

    पन्हाळा तालुक्यातील गोठे इथं पती-पत्नी सह मुलाची सामूहिक आत्महत्या

    कुंभी नदीपात्रात सापडले तिघांचे मृतदेह

    आई वडिलांनी लहान मुलग्याला दोरीने बांधून घेतली नदीत उडी

    आज सकाळी प्रकार उघडकीस

    घरातून काल गुरुवारी रात्री ११ नंतर पडले होते बाहेर

    कळे पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल

    गोठे सह कळे परिसरात होतेय हळहळ व्यक्त

  • 16 Apr 2021 11:30 AM (IST)

    संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

    कोल्हापूर -

    संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

    शहरातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात

    प्रत्येक वाहनधारकांची होतेय कसून चौकशी

    काल संचार बंदीचा फज्जा उडाल्यानंतर आज पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

  • 16 Apr 2021 11:27 AM (IST)

    नाशिक शहरात ऑक्सिजन बेड शिल्लक नाही, अॅम्ब्युलन्समधला ऑक्सिजन देऊन वाचवले रुग्णाचे प्राण

    नाशिक -

    शहरात ऑक्सिजन बेड शिल्लक नाही

    खाजगी कारमध्ये आलेल्या रुग्णाला अॅम्ब्युलन्स चालकांनी केली मदत

    अॅम्ब्युलन्समधला ऑक्सिजन देऊन वाचवले रुग्णाचे प्राण

    जागा मिळत नसल्याने रुग्ण फिरला संपूर्ण शहरात

    अम्ब्युलन्स चालकांची अशीही माणुसकी

  • 16 Apr 2021 11:14 AM (IST)

    लॅाकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये, चौक चौकात नाकाबंदी

    - लॅाकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये

    - नागपूरात चौक चौकात पोलिसांची नाकाबंदी सुरु

    - नागपूरातील व्हेरायटी चौकात ५० पेक्षा जास्त पोलीस तैनात

    - रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक वाहनांची होतेय तपासणी

    - विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई सुरु

    - पहिल्या दिवशी लोकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्यानं, आज पोलीस ॲक्शन मोडमध्ये

  • 16 Apr 2021 11:01 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांची संध्याकाळी 4 वाजता बैठक, मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार मुंबईतील कोवीड-19 परिस्थितीचा आढावा

    संध्याकाळी 4 वाजता बैठक,

    व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार चर्चा

  • 16 Apr 2021 10:23 AM (IST)

    एमआयडीसीमध्ये काम करणारे अनेक कामगार कोल्हापुरात अडकले

    कोल्हापूर -

    एमआयडीसीमध्ये काम करणारे अनेक कामगार कोल्हापुरात अडकले

    झारखंड युपी बिहारला जाण्यासाठी कोल्हापूरातून आठवड्याला एकच रेल्वे

    आज पहाटे चार वाजता सुटली धनबाद एक्सप्रेस

    मात्र गर्दीमुळे अनेक कामगारांना रेल्वे प्रशासन रोखलं

    तिकिटाचे पैसे घेऊन प्रवेश न दिल्याने कामगार संतप्त

    कामगारांना पुन्हा आठवडाभर करावी लागणार प्रतीक्षा

  • 16 Apr 2021 10:20 AM (IST)

    बारामतीत कोरोनाचा प्रकोप थांबेना, 324 नवे कोरोनाबाधित

    बारामती -

    - बारामतीत कोरोनाचा प्रकोप थांबेना

    - आज 324 जण कोरोनाबाधित

    - एकूण रुग्ण 13003 वर

    - काल झाली होती 983 संशयित रुग्णांची तपासणी

    - बारामतीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

  • 16 Apr 2021 10:17 AM (IST)

    कोरोनाचे बारामती तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

    बारामती :

    - कोरोनाचे बारामती तालुक्यात सर्वाधिक रुग्ण - बारामती तालुका ठरला हॉटस्पॉट - बारामतीत सध्या २५७६ सक्रिय कोरोना रुग्ण - पुणे जिल्ह्यात बारामती तालुका तिसऱ्या क्रमांकावर

  • 16 Apr 2021 09:21 AM (IST)

    पुण्यासाठी 20 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मुंबई महापालिकेकडे मागणी

    पुणे

    पुण्यासाठी 20 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मुंबई महापालिकेकडे मागणी

    विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्र लिहून केली मुबंई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे मागणी

  • 16 Apr 2021 09:10 AM (IST)

    सातारा जिल्ह्यात बावधनच्या बगाड यात्रेमुळे आतापर्यन्त 134 जण पाॅझिटिव्ह

    सातारा जिल्ह्यात बावधनच्या बगाड यात्रेमुळे आतापर्यन्त 134 जण पाॅझिटिव्ह

    2 एप्रिलला पार पडलेल्या यात्रेपासुन आतापर्यन्त कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ...

    अजुन ही बावधन गावात कोरोना वाढण्याची भिती कायम....

    सातारा जिल्हयात 1260 रेमडिसिव्हर इंजेक्शन उपलब्ध....

    रोजची 200 रुग्णांना रेमडिसिव्हर इजेंक्शनची गरज....

    जिल्हयात 10 हजार 575 रुग्णांवर उपचार सुरु आहेत..

    सातारा जिल्हयात कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्व मालिकांचे चित्रिकरण बंद...

    देवमाणुस, मुलगी झाली हो, आई माझी काळुबाई, घेतला वसा टाकु नको या मालिकांचे सुरु होते चित्रिकरण...

    जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश....

  • 16 Apr 2021 08:14 AM (IST)

    नागपुरात कडक निर्बंध असतांनाही नियमांची पायमल्ली

    - नागपुरात कडक निर्बंध असतांनाही नियमांची पायमल्ली

    - नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी लोकांची गर्दी

    - पोलिसांनी लोकांना पाठवलं परत

    - पोलिसांनी संपूर्ण रेशीमबाग मैदान केलं खाली

    - कोविडमुळे मैदान बंद आहे पण इथे झाली होती गर्दी

  • 16 Apr 2021 08:13 AM (IST)

    विरारमध्ये संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही लोकलची गर्दी कायम

    विरार -

    - संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही लोकलची गर्दी कायम

    - विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल नेहमीप्रमाणे तुडुंब भरुन जात आहेत

    - स्थानकावर अद्यापही कुणाचीही तपासणी केल्या जात नाही, त्यामुळे प्रत्येक प्रवासी हा लोकल पकडून मुंबईच्या दिशेने जात आहे

    - लोकलची रोजची गर्दी ही नेहमीचीच आहे. गर्दी कमी करा अन्यथा कडक संचारबंदी सुरु होईल, असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे

    - पण आज दुसऱ्या दिवशी ही लोकलला तीच परिस्थिती आहे

  • 16 Apr 2021 08:09 AM (IST)

    राज्य सरकार विचार करतंय, बुटीबोरीत निर्बंध कठोर

    - राज्य सरकार विचार करतंय, बुटीबोरीत निर्बंध कठोर

    - नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीत दुकानं ८ ते १ सुरु राहणार

    - लॅाकडाऊनच्या पहिल्या दिवशी गर्दी उसळल्याने निर्णय

    - दुपारी एक नंतर बुटीबोरीत मेडीकल आणि दवाखाने सुरु राहणार

    - बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांचा निर्णय

    - बुटीबोरीत कोरोनाची भयावह स्थिती

    - कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

  • 16 Apr 2021 08:04 AM (IST)

    नागपुरातील कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये 100 खाटांचं कोव्हिड रुग्णालय सुरु

    - नागपुरातील कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये 100 खाटांचं कोव्हिड रुग्णालय सुरु

    - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरुवात

    - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

    - नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी आणखी बेड वाढवणं गरजेचं

    - नागपूरात उपचाराअभावी मरत आहेत कोरोना रुग्ण

  • 16 Apr 2021 08:02 AM (IST)

    पुण्यात खासगी हॉस्पिटलला सरकारी व्हेंटिलेटर मिळणार भाड्याने

    पुणे

    पुण्यात खासगी हॉस्पिटलला सरकारी व्हेंटिलेटर मिळणार भाड्याने

    विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली परवानगी

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य संस्थांमधील वापरात नसलेले परंतु वापरण्यायोग्य असलेले सरकारी व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना देणार भाड्याने

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत राव यांच्याकडे मागितली होती परवानगी

    व्हेंटिलेटरसाठी प्रति दिन भाडे आकारणी केली जाणार

    यानुसार सरकारी निधीतून खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरला दररोज प्रत्येकी ५५० रुपये

    तर, लोकसहभाग किंवा सामाजिक उत्तरदायित्व निधीतून खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरला दररोज प्रत्येकी १०० रुपये भाडे आकारले जाणार

  • 16 Apr 2021 08:01 AM (IST)

    कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या भाविकांनी कोविड चाचणी करावी, पोलीस अधिक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

    वर्धा फ्लॅश

    - कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक

    - कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या भाविकांनी कोविड चाचणी करावी

    - वर्ध्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

    - हरिद्वार (उत्तराखंड) येथे झालेल्या कुंभमेळयाकरीता वर्धा जिल्हयातुन गेलेले काही भावीक आता परतीच्या वाटेवर आहेत.

    - कुंभमेळ्यातून परतणाऱ्या सर्व भाविकांनी जिल्हयात परत आल्यावर स्वतः कोविड सेंटर येथे जावून कोविड तपासणी करुन घ्यावी व गृहविलगीकरणात राहुन गृहविलगीकरणाच्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे

    - असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर आणि जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

    - तसेच कुंभमेळयात गेलेल्या आणि परत आल्यावर गृह विलगिकरणात न राहणाऱ्या व्यक्तींबाबत कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष वर्धा येथे 100 या क्रमांकावर वर संपर्क करावा.

  • 16 Apr 2021 07:59 AM (IST)

    सोलापुरातील पोट निवडणुकीमुळे जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी शिथिल, जमावबंदीचे आदेश कायम राहणार

    सोलापूर -

    पोट निवडणुकीमुळे जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी शिथिल

    मात्र जमावबंदीचे आदेश कायम राहणार

    पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी होत आहे मतदान

    मतदान करण्यासाठी मतदारांना जाणे-येणे सुलभ व्हावे यासाठी संचारबंदी शिथिल

    16 एप्रिल च्या सकाळी सात वाजल्यापासून ते 18 एप्रिल च्या सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी शिथिल

    जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केला आदेश जारी

  • 16 Apr 2021 07:31 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोनाची भयावह स्थिती, जिल्ह्यात 22 दिवसांत वाढले एक लाख कोरोना रुग्ण

    - नागपूर जिल्ह्यात कोरोनाची भयावह स्थिती

    - जिल्ह्यात 22 दिवसांत वाढले एक लाख कोरोना रुग्ण

    - जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधीतांचा आकडा तीन लाख पार

    - पहिले एक लाख रुग्ण १३५ दिवसांत, दुसरे एक लाख रुग्ण १४४ दिवसांत

    - एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यात ९३६ कोरोना मृत्यू

    - एप्रिलच्या १५ दिवसांत वाढले सर्वांधीक कोरोना रुग्ण

  • 16 Apr 2021 07:30 AM (IST)

    आता व्हॅाट्सअॅपवर मिळणार कोरोनाचा RTPCR रिपोर्ट

    - आता व्हॅाट्सअॅपवर मिळणार कोरोनाचा RTPCR रिपोर्ट

    - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे लॅब ला आदेश

    - संक्रमीक रुग्णांची माहिती २४ तासांत पोर्टलवर अपलोड करा

    - निगेटीव्ह व्यक्तींचे रिपोर्ट सात दिवसांत पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश

    - आदेश पालन न केल्यास प्रयोगशाळांवर कठोर कारवाईचे आदेश

  • 16 Apr 2021 07:04 AM (IST)

    नाशकात कोरोनाची दाहक वाढ कायम, 5067 रुग्णांनी झाली वाढ

    नाशिक -

    कोरोनाची दाहक वाढ कायम

    काल जिल्ह्यात दिवसभरात, कोरोना बाधितांच्या संख्येत 5067 रुग्णांनी झाली वाढ

    दिवसभरात 35 जणांचा मृत्यू

    बळींची आतापर्यंतची उच्चांकी संख्या

    अवघ्या 4 दिवसात 200 बळी

    बळींची संख्या झाली 2816

    नाशिक शहर हॉटस्पॉट कायम

    दिवसभरात 2935 नवे बाधीत,19 बळी

  • 16 Apr 2021 07:03 AM (IST)

    सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव यंदा देखील रद्द

    नाशिक -

    सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव यंदा देखील रद्द

    ब्रेक द चेन अंतर्गत विश्वस्त मंडळाचा निर्णय

    भाविकांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था होणार

    यात्रोत्सव रद्द झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

    21 एप्रिल ते 27 एप्रिल होणार होता उत्सव

    चैत्रोत्सवाला वणी गडावर येतात लाखो भाविक

  • 16 Apr 2021 07:01 AM (IST)

    नागपुरात गेल्या 24 तासांत 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    नागपुरात गेल्या 24 तासांत 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    5 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    दिवसभरात 4 हजार 634 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

    आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 99 हजार 849 वर पोहोचली

    त्यातील 2 लाख 32 हजार 705 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले

    नागपुरातील मृत्युच्या संख्येनं आता 6 हजारांचा आकडा पार केलाय

    नागपुरातील एकूण मृतांची संख्या 6 हजार 34 वर जाऊन पोहोचली

  • 16 Apr 2021 06:57 AM (IST)

    पुणे शहरात गेल्या 24 तासांत दिवसभरात 5 हजार 395 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

    पुणे शहरात गेल्या 24 तासांत दिवसभरात 5 हजार 395 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

    दिवसभरात एकूण 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    तर पुण्यात दिवसभरात 4 हजार 321 जण कोरोनामुक्त

    पुण्यात सध्या 54 हजार 351 जणांवर उपचार सुरु आहेत.

    कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 49 हजार 424 वर जाऊन पोहोचली

    2 लाख 89 हजार 122 जण कोरोनामुक्त झालेत

    तर आतापर्यंत 5 हजार 951 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

  • 16 Apr 2021 06:54 AM (IST)

    मुंबईत गेल्या 24 तासांत 8 हजार 217 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    मुंबईत गेल्या 24 तासांत 8 हजार 217 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    दिवसभरात 10 हजार 97 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

    दिवसभरात मुंबईत 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

    मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत

    आजच्या आकडेवारीनुसार मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 82 टक्क्यांवर पोहोचला

    तर रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवसांवर येऊन ठेपला

  • 16 Apr 2021 06:52 AM (IST)

    राज्यात 61 हजार 695 नवे रुग्ण, तर 349 जणांचा मृत्यू

    राज्यात गेल्या 24 तासांत 61 हजार 695 नवे रुग्ण, तर 349 जणांचा मृत्यू

    53 हजार 335 जण पूर्णपणे कोरोनामुक्त

    राज्यात सध्या 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली

    राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 वर जाऊन पोहोचली आहे

    मृतांचा आकडा 59 हजार 153 वर जाऊन पोहोचला

Published On - Apr 16,2021 11:56 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.