Maharashtra Coronavirus LIVE Update : शुक्रवारी नागपूर मनपा केंद्रांमध्ये कोव्हिशील्ड उपलब्ध

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Maharashtra Coronavirus LIVE Update : शुक्रवारी नागपूर मनपा केंद्रांमध्ये कोव्हिशील्ड उपलब्ध
CORONA latest cases

| Edited By: prajwal dhage

Jul 23, 2021 | 12:41 AM

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 8,159 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 7,839 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,08,750 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 94,745 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 22 Jul 2021 08:38 PM (IST)

  शुक्रवारी नागपूर मनपा केंद्रांमध्ये कोव्हिशील्ड उपलब्ध

  नागपूर – शुक्रवारी नागपूर मनपा केंद्रांमध्ये कोव्हिशील्ड उपलब्ध

  राज्य शासनाकडून कोव्हिशील्ड लसी प्राप्त झाल्यामुळे 18  वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रावर शुक्रवारी २३ जुलै रोजी होणार आहे.

  या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशील्ड लस नि:शुल्क दिली जाईल

  त्यांचे लसीकरण सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत केले जाई

 • 22 Jul 2021 07:41 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 333 कोरोना रुग्णांची वाढ

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 333 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

  – दिवसभरात 187 रुग्णांना डिस्चार्ज.

  – पुण्यात करोनाबाधीत 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 4.

  -224 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 485035

  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3007

  – एकूण मृत्यू -8715

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 473313

 • 22 Jul 2021 07:31 PM (IST)

  नागपुरात आज 9 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात आज 9 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  21 जणांनी केली कोरोनावर मात

  तर आज एकाचाही मृत्यू नाही

  एकूण रुग्णसंख्या - 492795

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 482413

  एकूण मृत्यूसंख्या - 10115

 • 22 Jul 2021 06:35 PM (IST)

  नाशिकमध्ये दिवसभरात 104 जण कोरोनामुक्त, दिवसभरात 89 रुग्णांची वाढ

  22 जुलै 2021 नाशिक कोरोना अपडेट

  आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 104

  आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ - 89

  नाशिक मनपा- 16

  नाशिक ग्रामीण- 70

  मालेगाव मनपा- 03

  जिल्हा बाह्य- 00

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 8486

  आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 03

  नाशिक मनपा- 02

  मालेगाव मनपा- 00

  नाशिक ग्रामीण- 01

  जिल्हा बाह्य- 00

 • 22 Jul 2021 09:13 AM (IST)

  सोलापुरात चार दिवसांनी कोरोना लसीकरण केंद्र सुरु, विडी कामगारांची लस घेण्यासाठी गर्दी

  सोलापुर - चार दिवसानंतर लसीकरण मोहिमेला सुरुवात

  लसीअभावी शहराबरोबरच ग्रामीण भागातील लसीकरण मोहीम झाल्यावर ठप्प

  शहरातल्या अनेक आरोग्य केंद्रावर विडी कामगार महिलांसाठी आज लसीकरण

  लस घेण्यासाठी विडी वळतच कामगार महिलांनी लावल्या रांगा

 • 22 Jul 2021 06:47 AM (IST)

  राज्यात गेल्या 24 तासांत 8,159 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

  राज्यात गेल्या 24 तासांत 8,159 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली

  गेल्या 24 तासांत नवीन 7,839 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत

  एकूण 60,08,750 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत

  राज्यात एकूण 94,745 सक्रिय रुग्ण आहेत

  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.33% झाले आहे

Published On - Jul 22,2021 6:28 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें