उद्यापासून त्या अंजलीताई दलालिया, धनंजय मुंडेंनंतर लक्ष्मण हाकेंचाही हल्लाबोल

धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या अंजली दमानिया यांच्यांवर लक्ष्मण हाकेंनी हल्ला चढवला आहे. त्यांनी अंजली दमानिया यांचा उल्लेख 'दलालिया' असा केला. यामुळे आता नवं वाक् युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

उद्यापासून त्या अंजलीताई दलालिया, धनंजय मुंडेंनंतर लक्ष्मण हाकेंचाही हल्लाबोल
लक्ष्मण हाकेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 9:35 AM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल सकाळी पत्रकार परिषद घेत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप दमानिया यांनी केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिशद घेत दमानियांचे सर्व आरोप फेटाळून लावले.अंजली बदानमियांनी.. बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता. त्यांच्या या हल्ल्यानंतर आणखी एका नेत्याने अंजली दमानियांवर आरोपांचा फैरी झाडल्या आहेत. अंजली दमानिया सनसनाटी असून मीडियामध्ये स्पेसच्या शोधासाठी असलेला एक चेहरा आहे. मी त्यांना सामाजिक कार्यकर्ता मानत नाही, उद्यापासून त्यांना अंजली ताई दलालिया असं ओळखण्यात यावं अशा शब्दांत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दमानियांवर हल्ला चढवला. काल जालन्यात माध्यमांशी बोलताना त्यांना दमानियांवर टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले लक्ष्मण हाके ?

अंजली दमानिया यांनी जे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहे तेच पुरावे घेऊन कोर्टाकडे जावं. अंजली दमानिया सनसनाटी असून मीडियामध्ये स्पेसच्या शोधासाठी असलेला एक चेहरा आहे. त्यामुळे मी त्यांना सामाजिक कार्यकर्ता मानत नाही. मी तर यापुढेही जाऊन सांगतो उद्यापासून त्यांना अंजली ताई दलालिया असं त्यांना उद्यापासून ओळखण्यात यावं, अशी टीका हाके यांनी केली. निवडक नेत्यांची प्रकरणं उकरुन काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायच, हा दमानिया यांचा एककलमी कार्यक्रम आहे. राज्यात त्यांनी जी प्रकरणं उपस्थित केली, त्यांच पुढे काय झालं हे महाराष्ट्राला माहीत आहे. दमानिया या फक्त मीडियात स्पेस शोधण्याचे काम करतात, त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये, असा थेट हल्ला हाके यांनी चढवला.

भगवानगडावर पुरावे घेऊन जाऊन काय करणार ?

धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करताना सादर केलेले पुरावे आपण भगवानगडावर घेऊन जाणार असल्याचे अंजली दमानिया यांनी काल म्हटलं होतं. त्यावरूनही लक्ष्मण हाकेंनी त्यांना सुनावलं. ” पुरावे तिथे नेऊन काय उपयोग आहे. ते पुरावे तुम्ही न्यायालयात घेऊन जा, किमान शिक्षा तरी भेटेल. पुरावे जर तुम्ही कोर्टात घेऊन गेले तर त्याची छाननी होईल, त्या मधलं लॉजिक तपासले जाईल. तुम्ही भगवानगडावर पुरावे घेऊन जाऊन काय करणार आहात ?” असा सवालही लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांना विचारला.

काल अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अंजली दमानियांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटलं. दमानियांनी बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले. एवढेच नाही तर त्यांच्या बुद्धीची किव करावी का असं वाटतं, असंही मुंडे म्हणाले होते.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....