AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए ही पद्धत नाही बोलायची, त्याने नोकरी मागताच अजितदादा संतापले; नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

ए ही पद्धत नाही बोलायची, त्याने नोकरी मागताच अजितदादा संतापले; नेमकं काय घडलं?
ajit pawar angry
| Updated on: Jul 26, 2025 | 2:53 PM
Share

Ajit Pawar : उपमुख्यंत्री अजित पवार हे नेहमीच धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाचा वेग आणि थेट बोलण्याची पद्धत यामुळे ते सगळीकडे ओळखले जातात. कामात कुचराई केल्यामुळे ते अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर संतापल्याचेही दिसले आहे. सध्या मात्र अजितदादा पत्रकार परिषद चालू असताना एका व्यक्तीने नोकरी द्या अशी मागणी करताच चांगलेच संतापले आहेत. त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत चांगलेच सुनावले असून नियमात बसत असेल तर शंभर टक्के लाभ मिळेल असे आश्वासनही दिले आहे.

राज्याच्या क्रीडामंत्र्यांना भेटा – अजित पवार

अजित पवार यांनिा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरेही त्यांनी दिली. दरम्यान, पत्रकारांशी बोलत असतानाच एक व्यक्ती त्यांच्याकडे आली. दादा मला गव्हर्नेमेंट जॉब द्या, अशी मागणी करू लागली. त्यानंतर अजितदादांनी हे प्रकरण क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी तिथेच आमचे क्रीडामंत्री दत्ता भरणे आहेत. त्यांना तुम्ही जाऊन भेटा, असा सल्ला त्या तरुणाला दिला.

तर शंभर टक्के तुझं काम होईल

त्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपले चालूच ठेवल्याने अजित पवार संतापले. तुला हीच जागा आठवली का? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतरही समोरची व्यक्ती अजित पवार यांना बोलू लागली. यावर मात्र अजित पवार यांनी त्या व्यक्तीला मध्येच थांबवत ‘ए बोलायची ही पद्धत नाही. मी माहिती घेईल. मी कागद घेईन. तो व्यवस्थित पाहीन. तू बोलतोय त्यात तथ्य आहे का? हे बघेन. राज्य सरकारचं जे क्रीडाविषयक धोरण असेल त्यात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल. तू सरकारच्या धोरणात बसत नसशील तर तुला तसं कळवण्यात येईल,’ असं थेट अजित पवार यांनी त्या व्यक्तीला समजावलं.

माणिकराव कोकाटे यांच्याविषयी काय निर्णय?

अजित पवार यांनी खडसावल्यानंतर मात्र समोरची व्यक्ती शांत झाली. त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीन्याची चर्चा यावरही प्रतिक्रिया दिली. मी सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यानंतर काय तो निर्णय होईल, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.