मी जेवायला आलो तर बिल घेऊ नका, अजित दादांची मिश्किल टिपणी, असं का म्हणाले? काय आहे किस्सा?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दाैऱ्यावर आहेत. चाकण परिसरातील वाहतूककोडी त्यांनी बघितली. चाकणच्या वाहतूककोडींच्या समस्येसाठी त्यांचा हा दाैरा होता. यावेळी त्यांनी अत्यंत मोठी घोषणा केलीये.

अजित पवार हे पुणे दाैऱ्यावर आहेत. चाकण वाहतूककोडींवर ते बोलताना दिसले आणि त्यांनी संपूर्ण पाहणी देखील केली. यावेळी बोलताना अजित पवार हे म्हणाले की, चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे, त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पण आता यातून सुटका करुयात. चाकण आणि परिसरात महानगरपालिका करावी लागणार आहे. काहींना आवडेल न आवडेल, पण हे करावं लागेल. पुणे जिल्ह्यात नव्यानं तीन महापालिका कराव्या लागणार अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी यावेळीच्या भाषणात केली.
ते पुढे म्हणाले, मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका. चाकण आणि हिंजवडी भागात ही महापालिका करावी लागणार आहे. मी जेवायला आलो तर माझं बिल घेऊ नका, अजित दादांची मिश्किल टिपणी. हॉटेल मालक मला म्हणाले, अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की, नक्की जेवण करेन. तेंव्हा मात्र माझं बिल घेऊ नका. अशी मिश्किल टिपणी अजित पवारांनी केली.
पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल, असेही त्यांनी म्हटले. भाषणाच्यामध्ये बोलणाऱ्याला अजित पवारांनी चांगले झापले आहे. आम्ही काय बिनडोक आहे का? तुम्हालाच लय कळतं व्हय, असे म्हणत अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतल्याचे बघायला मिळाले.
