मोठी बातमी! एनसीबीनं ड्रग्जकांडात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा, फडणवीसांचा गौप्यस्फोट

नसीबीने जी कारवाई केली यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आलं, तर काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून देण्यात आलं. मात्र तो क्लीन होता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

मोठी बातमी! एनसीबीनं ड्रग्जकांडात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा, फडणवीसांचा गौप्यस्फोट
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 10:09 PM

नागपूर : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी तसेच भाजपवर आरोप केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आलं. काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिलं. मात्र तो क्लीन होता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मात्र हा गौप्यस्फोट करताना फडणवीस यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. ते नागपूरमध्ये बोलत होते.

सोडून दिलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या जवळचा माणूस

“एनसीबीच्या कारवाईत अनेक लोकांना पकडण्यात आलं होतं. यातील जे लोक क्लीन होते त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होतं, त्यांना एनसीबीने पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. याच्याविरोधात एखादी संस्था काम करत असेल तर आपण त्या एजन्सीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हादेखील होता. तो क्लीन असल्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. ते कुठल्या पक्षाचे होते किंवा नव्हते हा मुद्दाच येत नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवाब मलिक यांचं दुखणं वेगळं

तसेच पुढे बोलताना, त्यांनी नवाब मलिक यांच्यावरदेखील टीका केली. एनसीबीचे खच्चीकरण करण्यात येत आहे का ? असे विचारताच त्यांनी नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्याविषयी मी याआधीही बोललेलो आहे, असे खोचक वक्तव्य फडणवीसांनी केले.

नवाब मलिक यांनी नेमके कोणते आरोप केले ?

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज (9 ऑक्टोबर) एनीसबीने क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी राज्य सरकार तसेच बॉलिवूडला बदनाम केलं जात असल्याचा आरोप केला. तसेच या कारवाईत पकडण्यात आलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आले. युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते. समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं,” असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

 एनसीबीने सर्व आरोप फेटाळले

दरम्यान, मलिक यांच्या आरोपानंतर एनसबीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. तीन नव्हे तर सहा जणांना सोडून देण्यात आले. त्यांच्याविरोधात पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडून दिले. तर उर्वरित आठ जणांबाबत पुरावे आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. आम्ही सर्व कारवाई कायद्यानुसार केली आहे. याबाबतचे कागदपत्रे आगामी काळात न्यायालयात सादर केले जातील, असे स्पष्टीकरण एनसीबीने दिले.

इतर बातम्या :

हातावर ‘देवेंद्र’ नावाचा टॅटू, आता म्हणतात, अजित पवारांवरील कारवाईचा निषेध, नरेंद्र पाटलांच्या मनात काय?

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज, राज्यभरातील आगारातून दररोज 1000 जादा गाड्या

जोडीदारासोबत लैंगिक समस्यांनी त्रस्त, त्याने थेट धारदार चाकूने स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

(devendra fadnavis alleges that ncb released one man who is close to ncp senior leaders son)

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.