AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य, विधानसभेत थेट सांगितलं…

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर फडणवीस आणि ठाकरेंमध्ये एक बैठक देखील झाली, या बैठकीवर आता फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरेंसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य, विधानसभेत थेट सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2025 | 4:13 PM
Share

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती, तिकडे स्कोप नाही पण इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता असं त्यांनी म्हटलं होतं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.

दरम्यान त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.  या बैठकीमध्ये हिंदी भाषा सक्ती, भाषा त्रिसूत्र आणि विरोधी पक्षनेतेपद यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात ही बैठक झाली.

या बैठकीची चर्चा सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर विधानसभेत प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला, ठाकरेंनी काल दिलेलं पुस्कक मी वाचलं.  कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होतं नाही, असं फडणवीस यांनी या बैठकीबाबत बोलताना म्हटलं आहे. दरम्यान पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरेंच्या कॅबिनेटसमोर आला होता,  ठाकरेंच्या कॅबिनेटनं अहवाल स्विकारला होता, असा दावाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

पाच जुलैरोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या भेटीनंतर महापालिकेसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होऊ शकते अशी जोरदार चर्चा रंगली आहे. त्यातच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता, यावर आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.