AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामाजिक न्याय विभागाला तब्बल 822 कोटीचा निधी प्राप्त, स्वाधार योजनेसह शिष्यवत्तीचे प्रश्न मार्गी लागणार

सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नांना यश मिळाले आहे. सामाजिक न्याय विभागाला एकूण 822 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीसाठी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविन्द कुमार, विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विशेष प्रयत्न करुन सातत्याने निधी मिळणे बाबत मागणी लावून धरली होती.

सामाजिक न्याय विभागाला तब्बल 822 कोटीचा निधी प्राप्त, स्वाधार योजनेसह शिष्यवत्तीचे प्रश्न मार्गी लागणार
धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 7:04 PM
Share

मुंबई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांना कोविड परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात समाज कल्याण आयुक्तालय मार्फत शासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नांना यश मिळाले आहे. सामाजिक न्याय विभागाला एकूण 822 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीसाठी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविन्द कुमार, विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विशेष प्रयत्न करुन सातत्याने निधी मिळणे बाबत मागणी लावून धरली होती. ( social justice department receives Rs 822 crore fund from Thackeray Government)

स्वाधार योजनेसह इतर महत्वाच्या, विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शासनाने सुमारे 822 कोटी 50 लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागास वितरित केला आहे. त्यामुळे सदरचा निधी लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाकडून वितरित करण्यात आलेला निधी व योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 30 कोटी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना करिता सन 2021-22 या आर्थिक वर्षात 200 कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. सन 2020-21 मधील विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देणे बाकी असल्याने शासनाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद पैकी सन 2020-21 या आर्थिक वर्षातील प्रलंबित रक्क्मेपोटी रुपये 30 कोटी खर्च करण्यास मंजुरी दिलेली आहे. सदरचा रुपये 30 कोटी निधी आयुक्तालयास  संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.. त्यानुसार समाज कल्याण आयुक्तालयाने दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी राज्यातील विभागीय कार्यालयांना रुपये 30 कोटी वितरित केले आहेत. त्यात मुंबई विभागासाठी 51 लाख, पुणे विभागासाठी 3 कोटी 44 लाख, नाशिक विभागासाठी 54 लाख  93 हजार, औरंगाबाद विभाग 4 कोटी 35 लाख 42 हजार, लातूर विभाग 12 कोटी 81 लाख 45 हजार, अमरावती विभाग 4 कोटी 78 लाख 96 हजार, नागपूर विभाग 3 कोटी 53 लाख 75 हजार असे एकूण 30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीसाठी 20 कोटी

परदेशात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजरर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम देण्यासाठी शासनाने रुपये 20 कोटी निधी आयुक्तालयास  संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थाना त्याची शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यात मिळणार आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे 585 कोटी

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दहावीनंतर विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क,परिक्षा शुल्क, व इतर मान्य बाबीवरील शुल्क हे शिष्यवृतीच्या माध्यमातुन दिले जाते. केंद्र शासनाच्या शंभर टक्के निधी या योजने खर्च होत असतो. त्यासाठी देखील शासनाने सन 2020-21 वर्षासाठी प्रलबित असलेल्या शिष्यवृत्ती व विद्यावेतन या बाबी खाली सुमारे 585 कोटी रुपये इतकी तरतूद समाज कल्याण आयुक्तालयास संगणक प्रणालीवर उपलब्ध करून दिली आहे.

मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी करिता 187 कोटी 50 लाख रुपये

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायन विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागामार्फत शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूती देण्यात येते. सदर योजनेसाठी शासनाने सन 2021-22 या अर्थिक वर्षासाठी 250 कोटी रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात केली आहे. त्यापैकी चालु अर्थिक वर्षासाठी शासनाने 187 कोटी 50 लाख रुपयांचा निधी आयुक्तालयात वितरित केला आहे.

कोविड काळात खर्चाचे अर्थिक बंधने असताना देखील शासनाने सामजिक न्याय विभागास चालु अर्थिक वर्षात 822 कोटी रुपयांचा निधी मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करुन दिला असल्याने राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थाना त्याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

“मागसवर्गीय विद्यार्थाना शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये म्हणुन शासनाने विशेष पाऊले उचली आहेत. यासंदर्भात शासकनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला यश मिळाले आहे. ही प्रलंबित शिष्यवृतीची रक्क्म लवकरच विद्यार्थ्याच्या बॅक खात्यात जमा होणार आहे”, माहिती समाज कल्याणचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी,17 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी, शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

Class XI : अकरावीचे प्रवेश कसे आणि कधी होणार? हायकोर्टाने सर्व सांगितलं!

social justice department receives Rs 822 crore fund from Thackeray Government

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.