PHOTO : टँकर उलटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, गोड्या तेलासाठी लोकांची गर्दी उसळली!
रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. धुळ्यातील डांगुर्णे दराने गावानजीक आज सकाळी 8:30 च्या दरम्यान गोड्या तेलाचा टँकर पलटी झाला.
Mar 03, 2022 | 6:40 PM
धुळ्यातील डांगुर्णे दराने गावानजीक आज सकाळी 8:30 च्या दरम्यान गोड्या तेलाचा टँकर पलटी झाला.
रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले.
तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली.
टँकर पलटी झाल्याने गोडेतेल रस्त्यावर पसरले होते. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात गोडेतेल जमा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली होती.
यानिमित्ताने का होईना किमान महिन्याभराचे तेल घरात येईल या अपेक्षेने लोकांनी मिळेल त्या भांड्यात तेल भरुन घरी नेले.