AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli Election Result 2024 : डोंबिवलीत कमळ पुन्हा फुलणार की मशाल पेटणार ? रवींद्र चव्हाण की दीपेश म्हात्रे, कोण विजयी ?

Dombivali Assembly election : 2009 पासून डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या तीन वेळेस निवडून येत भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी हॅटट्रिक केली. यंदाही ते विजयी पताक फडकावतील की दीपेश म्हात्रे त्यांची विजयी घोडदौड रोखतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर डोंबिवलीचा निकाल समोर आला आहे.

Dombivli Election Result 2024 : डोंबिवलीत कमळ पुन्हा फुलणार की मशाल पेटणार ? रवींद्र चव्हाण की दीपेश म्हात्रे, कोण विजयी ?
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण की दीपेश म्हात्रे, कोण विजयी ?
| Updated on: Nov 23, 2024 | 2:38 PM
Share

2008 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर डोंबिवली हा नवा , स्वतंत्र मतदारसंघ झाला. त्यानंतर पुढल्या वर्षीच झालेल्या विधानसभ निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या रवींद्र चव्हाणांनी विजयाचा गुलाल उधळला आणि तेव्हापासूनच डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला बनलां. त्यानंतर सलग तीन वेळा रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीदेखील. यंदा त्यांच्यासमोर आव्हान होते ते महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळालेल्या शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांचं. या दोघांमध्ये काटे की टक्कर झाली. मात्र 20 तारखेला केलेल्या मतदानात डोंबिवलीकरांनी मतदान केलं आणि त्यांनी कोणाला कौल दिलाय हे अखेर आज स्पष्ट होणार आहे. डोंबिवलीचा निकाल आज समोर  येणार आहे.

डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण वि. शिवसेना उबाठा गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात प्रमुख लढत होती. मात्र निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का बसला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना आयत्यावेळी पक्षात घेऊन डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने डोंबिवलीत एकच खळबळ माजली होती. यामुळ नाराज झालेले ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पद आणि शिवसेना सदस्यत्वाचा काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर मतदानाच्या 2 -3 दिवस आधीच त्यांनी 17 नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक जाहीर पत्र लिहून मनातील खदखद व्यक्त केली. तसेच भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना खुल समर्थन दिल्याचंही त्यातून स्पष्ट केलं. यामुळे दीपेश म्हात्रे यांची लढाई कठीण बनली.

डोंबिवलीतील समस्या

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात कापसे प्रशासकीय इमारतीसह विविध समस्या आहेत. तसेच डोंबिवली पूर्वेकडील असुरक्षित KDMC इमारतीचा पुनर्विकासाचा मुद्दाही बराच चर्चेत होता. तसेच केडीएसमी मनपाकडून सर्व अत्यावश्यक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पाऊल उचलण्याची मागणीही करण्यात येत होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता डोंबिवलीकरांनी कोणाला मतदान केलं, निवडून दिलं हे या निकालाने स्पष्ट होणार आहे

डोंबिवली विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल

2019 मध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण हे 86,227 मतं मिळवून विजयी झाले होते. तर मनसेचे श्रीकांत हळबे हे 44,916 मतं मिळवून दुसऱ्या स्थानी होते. २०१९ मध्ये भाजप, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत झाली होती. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत जवळचे सहकारी आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील आहेत.

डोंबिवली कागल विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.