AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचाराच्या मैदानात रक्ताचा सडा, थेट तलवारीने…घडलं असं काही की सगळीकडे खळबळ!

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. मात्र याच प्रचाराला गालबोट लागले आहे. दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. सोबतच तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.

प्रचाराच्या मैदानात रक्ताचा सडा, थेट तलवारीने...घडलं असं काही की सगळीकडे खळबळ!
parbhani pathri clashImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 6:33 PM
Share

Parbhani Congress Shinde Shiv Sena Clash : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकीय वातवरण ढवळून निघाले आहे. स्थानिक पातळीवर प्रचाराला मोठी रंगत चढली आहे. अनेक स्थानिक नेते, उमेदवार लोकांना आकर्षित करण्यासाठी रात्रदिवस एक करत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात यश येत आहेत, तर काही ठिकाणी मोठी लढाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान थेट दगडफेक आणि तलावरीने हल्ले केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

दगडफेक, तलवारीने हल्ले

मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात एक गंभीर प्रकार घडला आहे. येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मोठा वाद झाला आहे. प्रचाराला थेट हिंसक वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे ही हिंसा एवढी भडकली की थेट तलवारीने हल्ले करण्यात आले. 21 नोव्हेंबर 2025 रोजी ही घटना घडली आहे. घटनेत तलवार व चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तलवार हल्ला आणि दगडफेक केल्यामुळे काहींच्या डोक्यावर टाके लागले आहेत. जखमीला तत्काळ उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी वाढीव बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर हल्ल्याचे आरोप केले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांना दाखवले काळे झेंडे

काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाथरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजपेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांना काळे झेंडे दाखवण्यात दाखवले. परभणीच्या सेलू शहरात सपकाळ आले असता त्यांना भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणीच्या पाथरी येथे भाषणादरम्यान फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.