नांदेड महानगराच्या विस्तारामुळे इतर भागाचे नागरिकीकरण; शहरासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे नांदेडकरांना अश्वासन

नांदेड महापालिकांतर्गत शहरातील उत्तर मतदारसंघातील मुलभूत सुविधा, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा-नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा नांदेड रस्त्याचे दुपदरीकरण, आसना नदीवरील पासदगाव जवळील नवीन पुलाच्या कामाचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

नांदेड महानगराच्या विस्तारामुळे इतर भागाचे नागरिकीकरण; शहरासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे नांदेडकरांना अश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:50 PM

नांदेड: नांदेड महानगराच्या (Nanded City) विस्तारामुळे उत्तर नांदेड अर्थात तरोडा, वाडी या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. अर्ध्या तासाच्या अंतरावर पुर्णासारखे मोठे रेल्वे जंक्शन, वसमतसारखी मोठी कृषि बाजारपेठ व इतर कृषि क्षेत्रात परिपूर्ण असलेल्या गावांचे अंतर लक्षात घेता पुर्णा, हिंगोली रस्ते विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे. 192 कोटीच्या (192 crore fund)  होणाऱ्या रस्ते विकासातून या भागातील वाहतूक सुलभतेसाठी मोठी सुविधा निर्माण होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. नांदेड महापालिकांतर्गत शहरातील उत्तर मतदारसंघातील मुलभूत सुविधा, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा-नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा नांदेड रस्त्याचे दुपदरीकरण, आसना नदीवरील पासदगाव जवळील नवीन पुलाच्या कामाचे प्रातिनिधीक भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

नांदेडमधील भक्ती लॉन्स येथे झालेल्या या प्रातिनिधीक भूमिपूजन समारंभास खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

नवीन पुलामुळे पुराचा फटका नाही

पासदगावजवळील पूल हा दरवर्षी पुराच्या पाण्याने वेढला जातो. पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्याने ते ओसरेपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक खोळंबून राहते. सध्या आहे त्या पुलाऐवजी नवीन पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.

हायब्रीड ॲन्युटी धोरणाअंतर्ग योजना

राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी धोरणाअंतर्गत परभणी जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या पोखर्णी (परभणी)-बोरवड-लिंबाळा-ताडकळस-पुर्णा ते नांदेड या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता नांदेड जिल्हा सीमेपर्यंत आहे. मात्र या सीमेपासून नांदेड शहरापर्यंत रस्ता अधिक चांगला होणे बाकी होते.

सीमा रस्ता प्रगतीपथावर

याचीही सुधारणा करणे व हायब्रीड ॲन्युइटीच्या धर्तीवर हा उरलेला मार्गही पूर्ण करणे आवश्यक होते. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून नांदेडकडे येणाऱ्या उमरा-सोडेगाव-बोल्डा-कुरुंदा-वसमत ते नांदेड हा जिल्हा सीमा रस्ता प्रगतीपथावर आहे.

वाहतूक सुविधेत मोठी सुलभता

याही रस्त्याचे काम नांदेडच्या जिल्हा सीमेपर्यंत मर्यादित होते. नांदेड शहर याला चांगल्या मार्गाने जोडल्या न गेल्यामुळे या वाहतुकीला मोठा आडथळा निर्माण झाला होता. याची सुधारणा करणे अत्यंत आवश्यक होते. या तीनही कामांमुळे वाहतूक सुविधेत मोठी सुलभता आता येणार आहे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.