AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhiwandiwala Trust: भिवंडीतील ट्रस्टची 22 एकर जमीन खरेदी प्रकरण; आमदार महेश बालदी यांची चौकशी होणार?; काय आहे प्रकरण?

maha vikas aghadi: महाविकास आघाडीतील आमदारांवर ईडी, आयकर आणि सीबीआयच्या धाडी सुरू असतानाच आता भाजपचे (bjp) आमदारही गोत्यात आले आहेत. खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टची जमीन काही सदस्यांनी विकल्याचं प्रकरण उघड झालं आहे.

Bhiwandiwala Trust: भिवंडीतील ट्रस्टची 22 एकर जमीन खरेदी प्रकरण; आमदार महेश बालदी यांची चौकशी होणार?; काय आहे प्रकरण?
भिवंडीतील ट्रस्टची 22 एकर जमीन खरेदी प्रकरण; आमदार महेश बालदी यांची चौकशी होणार?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 12:50 PM
Share

नवी मुंबई: महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) आमदारांवर ईडी, आयकर आणि सीबीआयच्या धाडी सुरू असतानाच आता भाजपचे (bjp) आमदारही गोत्यात आले आहेत. खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टची जमीन काही सदस्यांनी विकल्याचं प्रकरण उघड झालं आहे. या सदस्यांनी जमिनीच्या नोंदीवरून ट्रस्टचं नाव काढून टाकलं आणि ही जमीन विकली. त्यामुळे ट्रस्टचे 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ट्रस्टच्या सदस्यांविरोधात एलटी मार्ग पोलीस (LTmarg police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांनी यातील सुमारे 22 एकर जमीन ट्रस्टच्या सदस्यांकडून खरेदी केली होती. त्यामुळे बालदी यांचीही या प्रकरणी चौकशी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे भाजप आमदार महेश बालदी यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.

नवी मुंबई परिसरात आणि खासकरून सिडकोच्या क्षेत्रात खान बहादूर होरमसजी मानेकजी भिवंडीवाला ट्रस्टची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. या ट्रस्टच्या एका सदस्याने ट्रस्टच्या जमिनीच्या नोंदीवरून ट्रस्टचे नावच काढून टाकले. त्यानंतर त्याने या जागेच्या मोबदल्यात सिडकोकडे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडाची मागणी केली होती. नंतर त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची जमीन विकली. त्यामुळे ट्रस्टला 80 कोटी रुपयांचे नुकसान झाले. नवी मुंबईसह इतर ठिकाणच्या अनेक बिल्डरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन खरेदी केली. त्यात भाजपचे उरणचे आमदार महेश बालदी यांचाही समावेश आहे. बालदी यांनी जवळपास 22 एकर जमीन खरेदी केल्याचं दैनिक ‘सामना’च्या वृत्तात म्हटलं आहे.

बालदींकडून कितीचा व्यवहार?

महेश बालदी यांनी 2018मध्ये ही जमीन खरेदी केली होती. बालदी यांनी ट्रस्टच्या सदस्याकडून 22 एकर जमीन 16 कोटी 45 लाख रुपयांना खरेदी केली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे बालदी यांना ही जमीन विकण्यात आली होती. हे सर्व व्यवहार बेकायदा असल्याने या प्रकरणी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रस्टच्या प्रतिनिधी फरिदा दुबाश यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या खरेदी व्यवहाराबाबत बालदी यांचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याबाबत बालदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्ववादी भोंग्या’ची पुण्यातल्या प्रमुख शिलेदारालाच धास्ती, वसंत मोरे राजकीय धक्क्यात

Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari: आम्ही संघर्ष करत नाही, त्यांनाच खाजवायची सवय पडलीय; राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Maharashtra News Live Update : नवी दिल्ली शिवसेना खासदारांच्या बैठकीत नाराजी

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.