AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही सावध व्हा… कबुतरांना खायला घातलं, मुंबईत पहिला गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची मोठी कारवाई

उच्च न्यायालयाच्या मनाई नंतरही दादरच्या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. आज मुंबईत पहिला गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. कबूतर खाने बंद करण्याचे आदेश असताना देखील अनेक लोक कबूतरांना खाद्य देत आहेत.

तुम्हीही सावध व्हा... कबुतरांना खायला घातलं, मुंबईत पहिला गुन्हा दाखल; कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांची मोठी कारवाई
Mumbai Pigeon House
| Updated on: Aug 02, 2025 | 12:08 PM
Share

मुंबई : कबुतरांना खायला घातल्या प्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहीम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल झालाय. माहिमच्या एल. जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा अनोळखी चारचाकी चालकावर आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 270 आणि 271 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या मनाई नंतरही दादरच्या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त करत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिली आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतर खान्यावर कारवाईला सुरूवात मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलीये. मात्र, स्थानिक नागरिकांकडून याला विरोध केला जातोय. कबुतर खाना तोडायला पालिका का घाई करतेय? कबुतरानी जायचं कुठे? न्यायालयाच्या आदेशाने कारवाई होत असेल तर दादर स्थानकाच्या बाहेर फेरीवाले बसू देऊ नका हे देखील सांगितलं आहे, त्यावर का कारवाई केली जात नाही, असे नागरिकांनी म्हटले आहे.

मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतर खाना येथे पक्षांना खाद्य टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करायला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सकाळपासून तैनात असून पोलीस देखील याठिकाणी कारवाई करण्यासाठी उपस्थित आहेत. या कबुतर खाण्यात अनेक कबुतर ही वयस्कर आहेत त्यांना खायला मिळाल नाही तर ते रस्त्यावर येऊन गाडी खाली मरून जातात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

यासोबतच दादर कबूतर खान्यावर जाळी टाकण्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध केला. रात्री स्थानिकांनी विरोध केल्यानंतर दादर कबूतर खाना या परिसरात अजूनही मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. रात्री महापालिका अधिकाऱ्यांना पाहून नागरिकांनी रस्त्यावर उतरत विरोध केला होता. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पोलिसांशी चर्चा करावी व आम्हाला कबूतर खाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेळ द्यावा नागरिकांची मागणी.

तसेच एवढ्या रात्री कारवाई करायला का आलात नागरिकांचा सवाल. दादर कबूतर खाना येथे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी रात्री 11 नंतर पोहचले आणि त्यांचे म्हणजे होते की, वर जाळी टाकल्याने कबूतर येणार नाहीत आणि कोणी खायला देखील देऊ शकणार नाही. मात्र तिथे आलेल्या अधिकाऱ्यांना पाहून स्थानिक नागरिकांनी आणि जीवदया प्रेमींनी रस्त्याववर येऊन याला विरोध दर्शवला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.