सुरमई 800, तर कोळंबी 500 रुपये किलो, चक्रीवादळामुळे मासे महागले

मुंबईसह उपनगरात माशांच्या आवक घटली असून माशांच्या किंमतीतही 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये मासे खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले (Fish Rate increase in market) आहे.

सुरमई 800, तर कोळंबी 500 रुपये किलो, चक्रीवादळामुळे मासे महागले

ठाणे : अरबी समुद्रात सातत्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली (Fish Rate increase in market) आहे. त्यामुळे कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यासारख्या भागांमध्ये समुद्रात मासेमारीवर बंदी घाल्याने याचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेष म्हणजे मुंबईसह उपनगरात माशांच्या आवक घटली असून माशांच्या किंमतीतही 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये मासे खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले (Fish Rate increase in market) आहे.

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीचा हंगाम सुरु होतो. त्यानतंर ऑक्टोबरपासून चांगल्या प्रकारचे मासे मिळायला सुरुवात होते. मात्र क्यार, महा या दोन्ही अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा फटका मासे उत्पादनाला बसला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भाऊच्या धक्का या दोन ठिकाणाहून मुंबई उपनगर, ठाणे या ठिकाणी माशांची आवक होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून मासेमारी बंद असल्याचे माशांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे माशांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ्यात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. सद्य: स्थितीत बाजारात माशांची आवक होत नसल्याने त्याच्या किमतीत वाढ झाल्याचे मासळी विक्रेत्यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आसपासच्या परिसरात माशांची आवक घटल्याने माशांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पुरवठ्यात 60 ते 70 टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणं (Fish Rate increase in market) आहे.

ऑक्टोबर महिन्यात जवळपास 150 रुपये किलो या दराने मिळणारे बोंबिल सध्या 200 रुपये किलोने मिळत आहेत. तर 400 रुपये किलोने मिळणारी कोळंबी सध्या 500 रुपये किलोने मिळत आहे. पापलेटच्या किमतीतही वाढ झाली असून पापलेट आकारानुसार 600 ते 1200 रुपये किलोने मिळत होते. मात्र आता 800 ते 1500 रुपये किलोने मिळत आहेत. तसेच 550 रुपये किलोने मिळणारी सुरमई सध्या 800 रुपये किलोने मिळत आहेत.

त्यामुळे माशांच्या किमतीत प्रति किलोमागे 100 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे मासे खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गेल्या काही काळात जिताडा माशालाही खवय्यांकडून मोठी मागणी असते. उत्तम प्रतीच्या जिताडय़ाचे दरही किलोमागे 1 हजार ते 1200 रुपयांपर्यत पोहोचले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *