Ganpati Visarjan 2026 LIVE : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण; ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘मुंबईच्या राजा’ची विसर्जन मिरवणूक
Ganpati Visarjan 2026 LIVE Coverage Mumbai, Pune and Maharashtra: साश्रूनयनांनी आज लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात येणार आहे. अनेक मंडळांची विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर येथील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणूक आज निघतील.

LIVE NEWS & UPDATES
-
विरोधक दुष्काळावर बोलत नाही फक्त SIR च्या पाठी पडलेत – सचिन अहिर
विरोधकांना बाप्पा बुद्धी देवो कारण ते दुष्काळावर बोलत नाही फक्त SIR च्या पाठी पडले आहेत. ही लोक असे बोलतात जशी ते राजकीय पार्टी आहेत, मात्र त्यांनी आधी निवडणूक आयोगाकडून आपलं चिन्ह घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आमच्याशी बोललं पाहिजे असे शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन अहिर यांनी म्हटले आहे.
-
दुष्काळाचे सावट असताना भाजपा आमदाराने सेलिब्रेशन करणे कितपत योग्य ? – काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे
महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे सावट असताना आणि लोकप्रतिनिधी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत असताना मीरा-भाईंदरच्या भाजप आमदाराने आपल्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करणे कितपत योग्य आहे? असा थेट आणि संतप्त सवाल मीरा-भाईंदर काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी केला आहे.
-
-
पावसाने भामरागड तालुक्यातील 40 गावांच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला
गडचिरोली जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भामरागड तालुक्यातील 40 गावांच्या संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटला आहे. छत्तीसगड राज्यातील मुसळधार पाऊसाने इंद्रावती नदीला पुर आला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील परलाकोटा नदीला पूर आल्यामुळे परलाकोटा पुलावरून वाहतूक ठप्प झाली आहे.
-
नाशिक सर्वास इंडिया संस्थेच्यावतीने परदेशी नागरिकांनी केले बाप्पांचे विसर्जन
सर्वास इंडिया संस्थेच्यावतीने परदेशी नागरिकांनी नाशिक येथे गणपती बाप्पांचे विसर्जन केले आहे. ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर थिरकत परदेशी नागरिकांनी या सोहळ्यात भाग घेतला. जपान, तैवानवरून आलेल्या नागरिकांनी नाचत बाप्पांचे विसर्जन केले.
-
मुंबई – गणरायाला निरोप देण्यासाठी उसळली मोठी गर्दी
मुंबई – गणरायाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांचा सागर लोटला आहे.
-
-
पुणे – मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन संपन्न
पुणे – मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन संपन्न. भाविकांनी जड अंत:करणाने गणरायाला दिला निरोप.
-
नाशिक – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही काळ मिरवणूक थांबवली
नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही काळ मिरवणूक थांबवली. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. महात्मा गांधी रोडवर काही वेळेसाठी ठिय्या मांडला. पोलिसांकडून मिरवणूक लवकर पुढे काढण्याचा प्रयत्न मात्र मिरवणूक पुढे न नेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
-
-
पुणे – श्रीमंत दगडूशेठ गणपतीची थोड्याच वेळात निघणार मिरवणूक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती रथात विराजमान झाला असून रथ ओढण्यासाठी सात बैलजोड्या सज्ज आहेत. श्री वक्रतुंड रथातून श्रीमंत दगडूशेठ गणपतीची थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
-
सोलापुरातील गणेशोत्सव मिरवणुकीत तुकाराम मुंडे यांच्या कार्याचा गौरव करणारा देखावा
सोलापुरातील गणेशोत्सव मिरवणुकीत तुकाराम मुंडे यांच्या कार्याचा गौरव करणारा देखावा साकारण्यात आला. शहरातील पंचमुखी कला, क्रीडा गणेशोत्सव मंडळाकडून विशेष चित्ररथ . अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेसह अन्न, औषध प्रशासनाच्या कारवाईचा गौरव चित्ररथाद्वारे करण्यात आला. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही यंदाच्या वर्षी मुंडे साहेब आणि त्यांच्या विभागाचा गौरव करणारा देखावा केलाय, असं स्थानिकांनी सांगितलं.
-
मुंबई – लेझीमच्या गजरात चिंतामणीचं स्वागत
मुंबई – लेझीमच्या गजरात चिंतामणीचे स्वागत केलं जात आहे. पारंपरिक वाद्यसह लेझिम खेळत मिरवणूक मार्गावर चिंचपोकळीच्या चिंतामणीला मानवंदना देण्यात आली.
-
लासलगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
लासलगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
क्रांती मित्र मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात
दिवसभरात वीस मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणूक निघणार
लहान-मोठ्या व शालेय गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात
चिमुकल्या गणेशभक्तांकडून गणरायाला भावपूर्ण निरोप
पालखेड डाव्या कालव्यात स्विमिंग ग्रुपच्या मदतीने गणेशमूर्तींचे विसर्जन
-
गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांची लगबग, मोठ्या उत्साहात वाजत गाजत बाप्पांना निरोप
घराघरात मोठ्या उत्साहात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सर्वत्र निरोप दिला जातोय. नांदेड जिल्ह्यातही ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देत आहेत. नांदेड शहरातील ४४४ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे आज विसर्जन होणार असून विसर्जनासाठी महापालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
-
बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी
बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी
आदेशाचे उल्लंघन केल्यास चालक, मालक आणि संबंधित मंडळांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजे वाजेल, तेथील ठाणेदारांची तात्काळ बदली
शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून तब्बल २०२ उपद्रवींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई
-
अनंत चतुर्दशीला रायगडमध्ये पावसाची दमदार हजेरी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि माणगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे
-
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवुकीला सुरुवात झाली आहे. राजा गणेश मंडपातून बाहेर पडला आहे. लालबागचा राजा हा आता मार्केटमध्ये पोहोचला आहे. बारा दिवस लालबागच्या राजाची सेवा करण्यात आली. त्यानंतर लालबागचा राजा आता विर्सजनासाठी सज्ज झाला आहे.
-
नाशिकचा तिसरा मानाचा गणपती विर्सजनाला निघाला
नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत तिसरा मानाच्या गुलालवाडी व्यायामशाळेचा गणपती निघाला आहे. दूध बाजार परिसरात गणपती मिरवणूक दाखल झाला आहे. मंडळाचे पारंपारिक लेझीम वादन, रोपमलखांब सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नाशिकरांची एकच गर्दी झाली आहे.
-
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अन्नातील भेसळीच्या विरोधात रांगोळीच्या माध्यमातून संदेश
पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. या मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनोख्या पद्धतीचा अवलंब करण्यात आलाय. अन्नातील भेसळीच्या विरोधात रांगोळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे. या रांगोळीत अन्न भेसळीच्या राक्षसाला गणरायाच्या पायदळी तुडवतानाचे चित्र साकारण्यात आलेय. अन्न भेसळीला आळा बसावा आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ही जनजागृती करण्यात आलीये.
-
पु्ण्यातील मानाचा तिसरा गणपती बेलबाग चौकात
पुण्यात मानाच्या गणपतीचं विसर्जनाला सुरुवात झाली आहे. या विसर्जनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळात आहे. तर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ बेलबाग चौकात दाखल झाला आहे.
-
पुण्यात गणेश विसर्जनास सुरुवात! भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापौर रस्त्यावर
पुण्यातील विसर्जन मार्गावर पायी फिरत महापालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत विसर्जन मार्गावर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा महापौरांकडून घेण्यात येत आहे. मिरवणुकीसाठी येणाऱ्या गणेश भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वतः महापौर मंजुषा नागपुरे रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळत आहे. गणेश मिरवणुकीचे नियोजन व्यवस्थित व्हावं असे आमचे प्रयत्न असल्याचं महापौर नागपुरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
-
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी अनोखा उपक्रम
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धाराशिव नगरपालिकेच्या वतीने गणेशमूर्ती संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीये. शहरातील प्रत्येक विभागात नगरपालिकेची एक गाडी तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक गाडीसोबत दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गाड्या शहरातील गल्ली-बोळात जाऊन नागरिकांकडून गणेशमूर्ती संकलित करणार आहे.
-
पुण्यात मानाच्या गणपीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. ढोल-ताशांचा गजरात बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण पुणे दुमदुमून गेलाय. मात्र या उत्सवाच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडेही लक्ष वेधण्यात येतंय. तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात आहे त्यामुले या तरुणांनी व्यसनापासून दूर जावं आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. नाशमुक्त भारताचा संकल्प करत गणरायाकडे याचसाठी साकडं घालण्यात आलं आहे.
-
पाण्याच्या तळाशी जाऊन सागर खेडकर यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे भावनिक विसर्जन केलं
चाळीसगाव तालुक्यातील सागर खेडकर यांनी गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली अनोखी गणेश विसर्जनाची परंपरा यंदाही जपली. पाण्याच्या तळाशी जाऊन सागर खेडकर यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे भावनिक विसर्जन केले. बाप्पाला निरोप देताना सागर खेडकर यांनी भक्ती आणि भावनेचा अनोखा अनुभव यावेळी व्यक्त केला. शाडू मातीची मूर्ती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यात आले. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सागर खेडकर यांनी गणरायाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला.
-
श्रॉफ बिल्डिंगजवळ गणपती बाप्पावर पुष्पवृष्टी
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्रॉफ बिल्डिंगजवळ भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. बाप्पाच्या निरोपासाठी भाविकांनी मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी केली. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि फुलांची उधळण यामुळे परिसर भक्तीमय झाला.
-
नशामुक्त भारताचा संकल्प करत गणरायाकडे याचसाठी साकडं
पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण पुणे दुमदुमून गेलं आहे. मात्र या उत्सवाच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात असताना, या तरुणांनी व्यसनापासून दूर जावं आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. नशामुक्त भारताचा संकल्प करत गणरायाकडे याचसाठी साकडं घालण्यात आलं.
-
जळगावात महापालिकेच्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू
जळगावात महापालिकेच्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. मानाच्या गणपतीपाठोपाठ जळगाव सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत महापालिकेच्या मानाच्या गणपतीच्या पाठोपात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती असतात. महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेविका आणि महिला अधिकाऱ्यांचा फुगडी खेळत मिरवणुकीत जल्लोष करण्यात आला.
-
‘मुंबईच्या राजा’ची विसर्जन मिरवणूक
ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘मुंबईच्या राजा’ची विसर्जन मिरवणूक उत्साहात निघाली. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर जमले होते. भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडत आहे.
-
नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली. पुणेरी पगडी घालून गिरीश महाजन यांचं स्वागत करण्यात आलं.
-
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची सुरुवात; सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला. गिरगाव चौपाटी परिसरात घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत. विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांकडून देखील कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि रूट मार्च काढण्यात येत आहे. पोलिसांच्या वाहनांचा ताफा सायरन वाजवत परिसरात गस्त घालत असून भाविकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
-
पुणे- गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी ‘वैद्यकीय मदत कक्ष सुरू
पुणे- गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी ‘वैद्यकीय मदत कक्ष सुरू आहे. पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाखो गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने आणि विविध सामाजिक संस्थांनी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठिकठिकाणी हे वैद्यकीय मदत कक्ष उभारले आहेत. मिरवणूक मार्गावर गर्दीमुळे किंवा उन्हामुळे भाविकांना कोणताही त्रास झाल्यास त्यांना तात्काळ प्रथमोपचार मिळावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
-
नाशिकमध्ये थोड्याच वेळात होणार गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
नाशिक- सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. संपूर्ण विसर्जन मार्गावर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपातून बाहेर; विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरूवात
मुंबई – चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपातून बाहेर आला असून पारंपरिक वाद्यच्या गजरात विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. गुलालालची उधळण करत, नाचत, बाप्पाचा जयघोष करत मिरवणूक सुरू झाली आहे. गेल्या 12 दिवसांपासून विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जात आहे.
-
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचा गणपती महात्मा फुले मंडई टिळक पुतळा इथं दाखल
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचा गणपती महात्मा फुले मंडई टिळक पुतळा इथं दाखल झाला आहे. गुरूजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणूक रथाला आकर्षण फुलांची सजावट करण्यात आली आहे. लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी पुण्यातील मध्यवर्ती पेठेतील रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपातून बाहेर
चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपातून बाहेर आला आहे. पारंपरिक वाद्यच्या गजरात मिरवणुकीला सुरवात झाली आहे. गुलालालची उधळण करत नाचत बप्पचा जयघोष करत मिरवणूक सुरू झाली आहे. गेल्या 12 दिवसापासून विराजमान असलेल्या गणपती बाप्पांला आज निरोप दिला जात आहे.
-
वाशिम शहरात गणेश विसर्जनाला सुरवात
वाशिम शहरात गणेश विसर्जनाला सुरवात झालीये…वाशिम शहरातील शिवशंकर गणेशमंडळ या पहिल्या क्रमांकाच्या मानाच्या गणपतीची लोकप्रतिनिधींनी पूजन करत मिरवणुकीला सुरवात केलीये. ढोलताशांच्या गजरात या मिरवणुकीला सुरवात झाली असून. वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख,वाशिमचे आमदार श्याम खोडे या सह वाशिम नगरपरिषदेचे अध्यक्ष,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी हे या मिरवणुकीत ढोलताशांच्या तालावर थिरकलेत या वेळी सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने विसर्जन मिरवणुकीत वेगळेपण पाहवयास मिळालं.. ही मिरवणूक उद्या सकाळपर्यंत चालणार असून देव तालावात गणेश मूर्तिचे विसर्जन होणारं आहे.
-
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा
मुंबईच्या प्रसिद्ध गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. मुंबई महानगरपालिकेने मोठ्या पंडालची उभारणी केली असून, पोलीस नियंत्रण कक्षही स्थापित करण्यात आला आहे. सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी दोन स्वतंत्र रांगा तयार करण्यात आल्या आहेत. चार फुटाखालील मूर्तींसाठी डावी रांग, तर चार फुटांवरील सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींसाठी उजवी रांग निश्चित करण्यात आली आहे.
-
मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
मुंबईतील परळचा राजा तेजुकायाच्या विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या संकल्पनेवर आधारित यंदाचा देखावा हे विशेष आकर्षण ठरले आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात हजारो भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.
-
बोरिवली येथून उपनगराचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
बोरिवली येथून उपनगराचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. उपनगराचा राजा ही उपनगरातील एकमेव भव्य मूर्ती आहे. उपनगरातील सर्वप्रथम मूर्ती आज विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे.
-
मुंबईतील बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ
मुंबईतील बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गणरायाला मंडपातून बाहेर काढताच भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. मोठ्या संख्येने गणेशभक्त बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. बोरिवली पूर्व येथून उपनगरच्या राजाची विसर्जन मिरवणूक गोराईच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, गोराई येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये उत्साहासोबतच भावनिक वातावरणही पाहायला मिळत आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
-
महिलांचे साकडे; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना
ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर येथील सार्वजनिक उत्सव मंडळ आणि शिवसेना शाखेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त लाडक्या गणरायाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाची आरती केली. आरतीनंतर उपस्थित महिलांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी गणरायासमोर साकडे घातले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला संघटिका संत ज्ञानेश्वर नगर येथील दिपाली कराळे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांच्यासह महिला पदाधिकारी, नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
काजुवाडी-वैतीनगर मित्र मंडळाचा ‘मीनाक्षी मंदिर’ देखावा ठरणार आकर्षण
काजुवाडी-वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा ४९ वा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ‘मीनाक्षी मंदिर, मदुराईचा प्राचीन द्रविड चमत्कार’ हा भव्य देखावा असणार आहे. तमिळनाडूतील मदुराई येथील ऐतिहासिक मीनाक्षी मंदिराची भव्यता, प्राचीन द्रविड स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसा या देखाव्यातून साकारण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या गणेशोत्सवाची परंपरा आजही उत्साहाने सुरू आहे. ‘काजूवाडीचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
-
चाळीसगाव तालुक्यातील सागर खेडकर यांनी गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली अनोखी गणेश विसर्जनाची परंपरा यंदाही जपली.
पाण्याच्या तळाशी जाऊन सागर खेडकर यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे भावनिक विसर्जन केले. बाप्पाला निरोप देताना सागर खेडकर यांनी भक्ती आणि भावनेचा अनोखा अनुभव यावेळी व्यक्त केला. शाडू मातीची मूर्ती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यात आले. भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सागर खेडकर यांनी गणरायाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला. विशेष म्हणजे, या अनोख्या गणेश विसर्जनाचे अंडरवॉटर व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले.
-
चिंचपोकळीच्या चिंतामणीची आरती सुरू
चिंचपोकळीच्या चिंतामणीची आरती सुरू होत आहे. आरती मिरवणुकीपूर्वी मंडपात पूजाविधी सुरू. थोड्यावेळात मिरवणुकीला होणार सुरुवात
-
काजुवाडी-वैतीनगर मित्र मंडळाचा ‘मीनाक्षी मंदिर’ देखावा ठरणार आकर्षण
-काजुवाडी-वैतीनगर रहिवासी मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा ४९ वा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ‘मीनाक्षी मंदिर, मदुराईचा प्राचीन द्रविड चमत्कार’ हा भव्य देखावा असणार आहे. तमिळनाडूतील मदुराई येथील ऐतिहासिक मीनाक्षी मंदिराची भव्यता, प्राचीन द्रविड स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसा या देखाव्यातून साकारण्यात येणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या गणेशोत्सवाची परंपरा आजही उत्साहाने सुरू आहे. ‘काजूवाडीचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. वैगई नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले मीनाक्षी मंदिर हे द्रविड स्थापत्यकलेचे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण मानले जाते. देवी पार्वतीचे रूप मानल्या जाणाऱ्या मीनाक्षी देवी आणि भगवान शंकराचे रूप मानल्या जाणाऱ्या सुंदरेश्वर यांना हे मंदिर समर्पित आहे. मीनाक्षी देवीची कथा स्त्रीशक्ती, शौर्य आणि पराक्रमाचे दर्शन घडविणारी आहे. या ऐतिहासिक मंदिराची भव्यता आणि स्थापत्यशैली ठाणेकरांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनुभवता यावी, या उद्देशाने मंडळाने हा देखावा साकारला आहे.
-
छगन भुजबळ विसर्जन मिरवणुकी मध्ये सहभागी
आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आपल्या संपुर्ण कुटुंबासह अखिल अंजिरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी मध्ये सहभागी होणार आहेत.
-
ठाण्यात गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षकाची हत्या
ठाण्यात गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षकाची हत्या….पोलिस उप निरीक्षक किसन भोईर यांची हत्या…गावगुंड आरोपी राजू वाल्मिकी याने केली हत्या. काही दारुची दुकाने रात्री उशीर पर्यंत सुरु आहेत त्या ठिकाणी पीएसआय भोईर कारवाई करायला गेले असता. तेथे राजू वाल्मिकी नावाचा गुंड रस्त्यावरच दारु पीत बसला होता. गस्त घालत असताना पीएसआय किसन भोईर यांना मिळाली होती माहिती. पीएसआय भोईर यांनी त्याला हटकले आणि पोलिस व्हॅन मध्ये बसण्यास सांगितले, यांत दोघां मध्ये बाचाबाच झाली. या धक्क्याने किसन भोईर जमिनीवर जोरात डोक्यावर आदळले. पीएसआय किसन भोईर यांचा धक्का दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू….आरोपी राजू वाल्मिकी याला तात्काळ अटक करण्यात आलीये. पुढील कारवाई साठी चितळसर मानपाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय
-
मिरवणुकीसाठी पुण्यात 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद
सध्या पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात आणि भाविकांच्या जयघोषात कसबा गणपतीला पालखीतून विसर्जनासाठी नेले जात आहे. या मिरवणुकीसाठी पुण्यात 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मानाच्या पाच गणपतींमध्ये कसबा गणपतीला प्रथम मान दिला जातो.
-
ठाण्यात गणरायासमोर महिलांचे साकडे; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना
ठाण्यात गणरायासमोर महिलांचे साकडे; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना. ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर येथील सार्वजनिक उत्सव मंडळ आणि शिवसेना शाखेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त लाडक्या गणरायाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाची आरती केली. आरतीनंतर उपस्थित महिलांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी गणरायासमोर साकडे घातले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला संघटिका संत ज्ञानेश्वर नगर येथील दिपाली कराळे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांच्यासह महिला पदाधिकारी, नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
पुणे आणि मुंबईत गणेश विसर्जन 2026 सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात सु
पुणे आणि मुंबईत गणेश विसर्जन 2026 सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. पुण्यातून मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. कसबा गणपतीला पुण्याचे ग्रामदैवत मानले जाते आणि त्याच्या मिरवणुकीनेच शहरातील विसर्जन सोहळ्याला सुरुवात होते.
-
सातपूर औद्योगिक वसाहतीत चारचाकी गाडीला अचानक आग
सातपूर औद्योगिक वसाहतीत चारचाकी गाडीला अचानक आग. टीडके इपकॉस कंपनीसमोर गुरुवारी सायंकाळी घडली घटना. कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी अग्निशामक यंत्रणेने आगीवर मिळवले नियंत्रण. आगीत गाडीचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली. गाडीला आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
-
मुंबईतील परळचा राजा तेजुकायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली
मुंबईतील परळचा राजा तेजुकायाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा या संकल्पनेवर आधारित यंदाचा देखावा भाविकांचे मुख्य आकर्षण ठरला आहे. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात हजारो भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी एकत्र जमले आहेत.
-
वाडीवऱ्हे हद्दीतील वालदेवी धरणावर गणपती विसर्जनास बंदी
वाडीवऱ्हे हद्दीतील वालदेवी धरणावर गणपती विसर्जनास बंदी. पिंपळद येथील गावकऱ्यांनी केला एकमताने ठराव मंजूर. नाशिक व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी विसर्जनासाठी न येण्याचे गावकऱ्यांचे आवाहन. सुरक्षिततेच्या कारणास्तव गावकऱ्यांचा एकमताने ठराव. जीवितहानी व धरणातील प्रदूषण टाळण्यासाठी घेतला निर्णय
-
मानाचा चौथा तुळशीबाग गणेशाची मूर्ती मुख्य रथात विराजमान
मानाचा चौथा तुळशीबाग गणेशाची मूर्ती मुख्य रथात विराजमान होत आहे, आता बाप्पाची मिरवणूकी निघेल, ज्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.
-
पुण्यातील मानाच्या गणपतीची मिरवणूक
पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती पालखीत विराजमान…मानाच्या तिसरा गुरुजी तालीम आणि चौथा तुळशीबाग गणपती एकापाठोपाठ मुख्य रस्त्यावर मिरवणूकीसाठी सज्ज…..
-
पुणे – भीमाशंकर परिसरात पावसाचा कहर
पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसानंतर आज मुसळधार सरी कोसळल्याने भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी मंदिर परिसरात आले आहे. त्यामुळे मंदिराच्या सभोवती पाणी साचले आहे. सध्या भिमाशंकर मंदिर परिसरात विविध विकास कामे सुरू असून सध्या पावसामुळे ही कामे बंद ठेवण्यात आली आहे …
-
मुंबईतील बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ
मुंबईतील बोरिवली पूर्व येथील उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.गणरायाला मंडपातून बाहेर काढताच भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. मोठ्या संख्येने गणेशभक्त बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. बोरिवली पूर्व येथून उपनगरच्या राजाची विसर्जन मिरवणूक गोराईच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, गोराई येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देताना भक्तांमध्ये उत्साहासोबतच भावनिक वातावरणही पाहायला मिळत आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात उपनगरचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
-
इंदापूर – निमगाव केतकीत गणेशाची उत्साहात विसर्जन मिरवणूक
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे काल रात्री सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात निरोप दिला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे विविध मंडळांनी डीजे ला फाटा देत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिलं. बँड पथक, ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या गजरात तरुणाईने ठेका धरला. सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मिरवणुकीला विशेष शोभा आली होती, आकर्षक फुलांची सजावट, गुलालाची उधळण आणि विद्युत रोषणाई यामुळे मिरवणूक लक्षवेधी ठरली. सर्व मंडळांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका पार पडल्या..
-
रायगड जिल्ह्यात आज दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता
रायगड जिल्ह्यात आज दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात तब्बल १३ हजार ५९७ बाप्पांचे विसर्जन होणार आहे. यामध्ये १३ हजार ४३९ घरगुती आणि १५८ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. नदी, तलाव आणि समुद्र अशा ५०० हून अधिक विसर्जनस्थळी बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.
-
ऐतिहासिक रंगारी बदक चाळीच्या महाराजांना निरोप देण्याची तयारी अंतिम टप्प्यात
ऐतिहासिक रंगारी बदक चाळीच्या महाराजांना विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. १९३७ मध्ये छोट्याशा खोलीत सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आहे. १९४० मध्ये सार्वजनिक मंडळाचे रूप मिळाले. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित या मंडळाने वर्षानुवर्षे समाजप्रबोधनाचे देखावे साकारत वारसा जपला. चलचित्रांच्या माध्यमातून सामाजिक आणि ऐतिहासिक विषय मांडण्याची रंगारी बदक चाळीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
-
पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार
पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. महात्मा फुले मंडई ते लक्ष्मी रोड विसर्जन मार्गावरती ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी रांगोळीची सजावट करण्यात आली आहे. रांगोळीच्या माध्यमातून खाद्यपदार्थात होणारी भेसळ या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे.
-
गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष
जड अंतःकरणाने लाडक्या गणरायाला भाविक भक्त आज निरोप देणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात भक्तीमय आणि चैतन्यमय वातावरण होते. घरोघरी गणपती बसवण्यात आले. तर सार्वजनिक गणेश मंडळांनी चित्तवेधक देखावे सादर केले. आज बाप्पााला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज गल्लोगल्ली गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सुरू झाला आहे.
-
पुण्यातील तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूक 9 वाजता
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूक 9 वाजता सुरू होणार आहे. तांबडी जोगेश्वरी मानाचा दुसरा गणपती आहे. गणेशाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त भावुक झाले आहेत.
-
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूकीला 10 वाजता होणार सुरूवात
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूकीला 10 वाजता सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या बैलजोडी आणि रथा वरील शेतमाल पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित असलेली बैलजोडी आणि शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेला शेतीमाल यांचा मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचा मुख्य रथाचा देखावा लक्ष वेधून घेत आहबे.
-
परळचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ
नरेपार्क येथील परळचा राजा विसर्नजनासाठी मार्गस्थ झाला. गणरायाच्या मनमोहक रुपाने भाविक हरकून गेले. वारकऱ्यांच्या रुपातील बाप्पाचं हे मनाला भावणारं रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. परळचा राजा मंडपातून लालबागच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
-
इगतपुरी पोलिस ठाण्यात गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन
इगतपुरी पोलिस ठाण्यात गणरायाचे पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. पोलिस ठाण्याच्या आवारातील कृत्रिम हौदात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ध्वनिक्षेपक न लावता साधेपणाने विसर्जन सोहळा पार पडलापोलिस बांधवांनी मनोभावे गणरायाची आरती केली. आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला.
-
लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्याची लगबग
11 दिवसाच्या मनोभावे सेवेनंतर लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. सर्व गणेश भक्त मंडपा मध्ये पांढरे वस्त्र परिधान करून, लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी करत आहेत. सकाळी ९ वाजल्या पासून विसर्जन मिरवणुकीची सुरवात होणार आहे. सकाळी १० वाजता लालबागचा राजाची विधिवत पूजा होणार. उत्तर पूजा नंतर लालबागचा राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूकीला दुपारी १२ वाजता सुरवात होणार आहे.
-
मुंबईचा राजा मार्गस्थ
मुंबई चा राजा मार्गस्थ झाला आहे. त्या साठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई च्या राजाचा आगामी वर्ष हे शतक महोत्सवी वर्ष असणार आहे. त्या साठी वेध शतकाची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.. तर राजाच्या पुष्पवृष्ठी ची देखील तयारी करण्यात आली आहे..
-
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या गणपतींसाठी स्वतंत्र मार्ग करण्यात आला आहे. समुद्रात कृत्रिम ब्रिजसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र रांगा दोन तयार करण्यात आल्या आहेत. चार फुटांखालील गणपतींसाठी डाव्या बाजूला, तर मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतींसाठी उजव्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पीओपीच्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित होऊ नयेत यासाठी कृत्रिम तलावांचीही उभारणी करण्यात आली आहे.
गणपती बाप्पा आज त्यांच्या गावाला निघाले, अर्थात आज राज्यात गणेश विसर्जन होत आहे. अनंत चतुर्दशीला साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात येत आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र रांगा दोन तयार करण्यात आल्या आहेत. मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेला लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक तराफ्यावरून अरबी समुद्रात सुरू होणार आहे. अत्याधुनिक हायड्रॅलिक तराफ्यावरून खोल समुद्रात राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी महापालिकांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणूक 9 वाजता वाजता सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन आणि एआय प्रणालीची गस्त असेल. यामुळे अनुचित प्रकारांना आळा घालणे सोपे होईल.
तर दुष्काळग्रस्त भागात नदी आणि नाले हे पाण्याचे स्त्रोत आटल्याने गणेश विसर्जन कुठे करावे असा सवाल भाविकांसमोर आहे. काही ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी विहिरीत विसर्जन करण्यात येणार आहे. काही तलावातही विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिका, नगरपालिका आणि प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी केली आहे.
Published On - Sep 25,2026 7:58 AM
