AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीची कायद्यात अस्पष्टता, केंद्राला नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची अद्यापही नेमणूक झालेली नसल्याने त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. (HC issues notice to Attorney General for Petition related to Vidhan Parishad 12 MLC)

राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीची कायद्यात अस्पष्टता, केंद्राला नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
| Updated on: Dec 23, 2020 | 11:07 AM
Share

मुंबई: राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची अद्यापही नेमणूक झालेली नसल्याने त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. राज्यपालांनी किती कालावधीत या सदस्यांची नियुक्ती करायची याची कायद्यात काहीही स्पष्टता नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरलला नोटीस बजावली असून केंद्र सरकारला या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यावर केंद्र सरकार काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (HC issues notice to Attorney General for Petition related to Vidhan Parishad 12 MLC)

राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. पण कोश्यारी यांनी अद्याप या सदस्यांची नियुक्ती केलेली नाही. या सदस्यांची नियुक्ती कधीपर्यंत करायची याची कायद्यात काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे राज्यपालांनी अद्याप या सदस्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. तर दुसरीकडे आता हा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील आणि दिलीप आगळे यांनी कोर्टात याचिका सादर करून या नियुक्तीबाबत काही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत संविधानाच्या अनुच्छेद 171(3) (ई) मध्ये या नियुक्ती प्रक्रियेबाबत अस्पष्टता आहे. त्यामुळे त्याचा गैरवापर राजकीय नेत्यांकडून होत आहे. तसेच यामध्ये राज्यपाल आणि मंत्रिमंडळाला महत्त्वाचे अधिकार आहेत, त्याबाबत भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे.

कोर्टाने याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन देशाच्या अ‍ॅटर्नी जनरलला नोटीस बजावून कायद्यातील या अस्पष्टतेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच या विषयावर कोर्टात प्रतिज्ञापत्रं सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपालांनी नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक किती कालावधीत करायची? याचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (HC issues notice to Attorney General for Petition related to Vidhan Parishad 12 MLC)

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी (HC issues notice to Attorney General for Petition related to Vidhan Parishad 12 MLC)

संबंधित बातम्या:

उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !

 निष्ठावान शिवसैनिकाला विधान परिषदेचं बक्षीस, विजय करंजकर यांची उमेदवारी निश्चित

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

(HC issues notice to Attorney General for Petition related to Vidhan Parishad 12 MLC)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.