प्रचंड वादळ, चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती, पानटपरी हवेत उडाली… सिंधुदुर्गमधील व्हिडिओ व्हायरल

सिंधुदुर्गमध्ये बुधवारी संध्याकाळी काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. ओरोस, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले भागात या वादळी पावसाने थैमान घातले. ओरोस येथे तर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रचंड वादळ, चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती, पानटपरी हवेत उडाली... सिंधुदुर्गमधील व्हिडिओ व्हायरल
सिंधुदुर्गमध्ये आलेले वादळ
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 1:33 PM

राज्यात अनेक भागात तापमानाने ४० पार केली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान ४३ अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाले आहे. त्याचवेळी राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्गमधील वादळी वाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याचे दिसत आहे. वादळामुळे धुळींचे प्रचंड लोट पसरले असून समोरचे काही दिसत नाही. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.

सिंधुदुर्गमध्ये बुधवारी संध्याकाळी काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. ओरोस, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले भागात या वादळी पावसाने थैमान घातले. ओरोस येथे तर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या वादळाचा एक व्हिडिओ वायरल झाला असून यात जोरदार पावसासह वादळ दिसून येत आहे. या वादळात एक पान टपरी पाला पाचोळयाप्रमाणे उडून गेली. तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती.

हे सुद्धा वाचा

चिपळूण तालुक्यात नुकसान

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण भागात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त झालेल्या डेरवण गावातील सुर्वेवाडी, काजारकोंड, गणेशवाडी या भागात स्थानिक आमदार शेखर निकमांनी पाहाणी करुन तात्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी यंत्रणेला सूचना केल्या.

यवतमाळमध्ये जोरदार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहेत. बुधावारी रात्री दरम्यान वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात दारव्हा आणि महागांव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला असून संपूर्ण केळीची बाग उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहेत.

अमरावती जिल्ह्यात पाऊस

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला भागात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. कारला व आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली, तर शेतात परिपक्व झालेल्या केळीची झाडे मोडून पडल्याने जमीनदोस्त झाली. काही दिवसांवर तोडणीस आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. २५ हेक्टरमधील केळी पिकाचे नुकसान झाले. शासनाने तातडीने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत
EVM हॅक होऊ शकते, एलॉन मस्क यांचा मोठा दावा, ट्विट चर्चेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार? वाचा सविस्तर.
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर
बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचं जोरदार उत्तर.
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 2 दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, किती वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक?.
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.