AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Year And Corona Rule | पार्टी करण्यासाठी पूर्ण वर्ष, गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई : दिलीप वळसे पाटील

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोणत्याही प्रकरे सार्वजनिक ठिकाणी येऊन गर्दी करत पार्टी करु नये असे आवाहान राज्य सरकारकरडून केले जात आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ला करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे स्पष्टपणे सांगितले आहे. ते माध्यमांशी मुंबईत बोलत होते.

New Year And Corona Rule | पार्टी करण्यासाठी पूर्ण वर्ष, गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई : दिलीप वळसे पाटील
DILIP WALSE PATIL
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 11:31 AM
Share

मुंबई : 2021 वर्ष संपत आले आहे. नव्या वर्षाची चाहूल लागली असून त्याच्या स्वागतासाठी तरुणाई आतूर आहे. तरुण तसेच इतर नागरिकांकडून 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातो. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी येऊन पार्टी करु नये असे आवाहान राज्य सरकारकरडून केले जात आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे स्पष्टपणे सांगितले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

तर कठोर कारवाई करण्यात येईल

यावेळी बोलताना नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. “ज्यांना पार्टी करायची आहे त्यांना पूर्ण वर्ष आहे. मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन कुटुंबीयांसोबत नव्या वर्षाचे स्वागत करा. पोलिसांना आम्ही काही सूचना दिल्या आहेत. जे लोक रस्त्यावर येतील त्यांच्याविरोधात कठोर करावाई करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कारवाई करण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करुन गर्दी करु नये, असे आवाहन मी नागरिकांना करतो,” असे वळसे पाटील म्हणाले.

आगामी काळात ही गुन्हेगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न

तसेच पुढे बोलताना त्यांनी दोन वर्षांपासूनची कोरोना स्थिती, पोलीस दलाची कामगिरी तसेच आगामी काळातील सुरक्षा आणि सुव्यवस्थेविषयीची तयारी यावरदेखील भाष्य केले. “मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्र तसेच देशात वेगळी स्थिती होती. लॉकडाऊन लावण्यात आले. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्राला झाला. यामुळे पोलीस, सरकार यांना खूप काम करावं लागलं. आर्थिक संकट उभं राहिलं. लॉकडाऊन संपल्यानंतर गुन्हेगारी घटनादेखील घडल्या. मात्र आगामी काळात ही गुन्हेगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच राज्यात विश्वासाचे वातावरण तयार करण्याचाही आमचा प्रयत्न असेल. आम्ही क्राईम कॉन्फरन्स बोलवली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व पोलीस अधिकारी येणार आहेत. सामान्य नागरिकांना पोलिसांवर विश्वास वाटला पाहिजे, असं यावेळी सांगण्यात येणार आहे,” अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मुंबईत आठ दिवसांची जमावबंदी 

दरम्यान, नववर्ष आगमन पाहता मुंबईत खबरदारी म्हणून  शहरात आठ दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशात 30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील असं सांगण्यात आलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही आदेशात सांगण्यात आलंय.

इतर बातम्या :

नसिरुद्दीन शाह म्हणाले, आम्ही 20 कोटी, घाबरणार नाही, भिडू, लढू, मोघलांबाबतही वादग्रस्त बोलले?

Sanjay Raut | अजित पवार शपथविधीसाठी फडणवीसांसोबत गेले, त्यावर पवार बोलले; आता राऊत हसून मिश्किलपणे पहिल्यांदाच म्हणाले…

‘पीएम किसान’ च्या दहाव्या हप्त्याचा मुहूर्त ठरला, शेतकऱ्यांचा होणार सन्मान अन् घ्यावी लागणार ही काळजी!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.