AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena NCP: शिवसेनाला गृहखातं हवंय?, भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने सेना-राष्ट्रवादीत धूसफूस; गृहमंत्री घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

भाजप (bjp) नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीत (ncp) धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याकडून भाजप नेत्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.

Shivsena NCP: शिवसेनाला गृहखातं हवंय?, भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने सेना-राष्ट्रवादीत धूसफूस; गृहमंत्री घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
शिवसेनाला गृहखातं हवंय?, भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने सेना-राष्ट्रवादीत धूसफूसImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 1:06 PM
Share

मुंबई: भाजप (bjp) नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादीत (ncp) धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याकडून भाजप नेत्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता जप्त केल्यानंतरही गृहखात्याकडून विरोधकांवर कारवाई केली जात नसल्याने शिवसेनेनेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादीकडे गृहखाते शिवसेनेला देण्याची मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. मागच्याकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते होते, त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांकडेही गृहखाते असावे अशी शिवसेनेची मागणी आहे. शिवसेनेने गृहखाते आपल्याकडे मागितल्याच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसेपाटील हे आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या मागणीवर काय प्रतिक्रिया येते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर धाडी टाकणं सुरू आहे. त्यातही शिवसेनेच्या नेत्यांवर सर्वाधिक धाडी टाकल्या आहेत. इतकच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. म्हणजे ईडी थेट मातोश्रीच्या दारापर्यंत आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणा एवढ्या सक्रिय झाल्यानंतरही राज्यातील गृहखात्याकडून विरोधकांवर कारवाई केली जात नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यानंतर दिलीप वळसेपाटील यांची भेट घेऊन राऊत यांनी या भ्रष्टाचारावर चर्चा केली. मात्र, तरीही काहीच कारवाई होत नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. त्यामुळेच गृहखातं आपल्याकडे घेण्यात यावं अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज गृहखात्याला कानपिचक्या दिल्यानंतर भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू असल्याचं अधोरेखित झालं आहे. त्यामुळेच आज दुपारी दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राऊत काय म्हणाले?

गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीर पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत असं समजा. गृहखात्यालाच आता दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आता राष्ट्रवादीवर दबावाचं राजकारण सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut On ED: आता रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास तेवढा ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी; राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra News Live Update : 6 एप्रिलला धोपेश्वर येथे ग्रामसभेचं आयोजन; रिफायनरीबाबत होणार ठराव

Satish Uke अटक प्रकरण : हे तर भाजपचं बदनाम करण्याचं षडयंत्र, नाना पटोले यांची टीका

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.