Ganeshotsav : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक, गणेशोत्सव समन्वय बैठक संपन्न

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान घरगुती श्री गणेश मूर्तींची उंची ही 2 फुटांपेक्षा अधिक नसावी, तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसाठीच्या श्री गणेश मूर्तींची उंची ही शक्य तेवढी कमी असावी, असेही आवाहन काळे यांनी आजच्या बैठकी दरम्यान केले.

Ganeshotsav : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक, गणेशोत्सव समन्वय बैठक संपन्न
गणेशोत्सवासाच्या परवानगीसाठी 1200 मंडळाचे अर्ज, 500 मंडळांना परवानगी; 23 ऑगस्टपर्यंत मुदत
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 04, 2022 | 9:34 PM

मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री गणेशोत्सव (Ganeshotsav) जवळ येत आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस बाप्पांचे आगमन होणार आहे. या निमित्ताने श्री गणरायाचे स्वागत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर विविध स्तरिय कामे योग्य प्रकारे सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री गणेश मूर्ती विसर्जना (Immersion)साठी कृत्रिम तलावां (Artificial Lake)ची निर्मिती करणे, झाडांची सुयोग्य प्रकारे छाटणी करणे आणि रस्त्यांच्या परिरक्षणाची कामे करणे; यासारखी विविध स्तरीय कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे चांगल्या प्रकारे करण्यात येत आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर साधण्यात येणारा सुसमन्वय हा निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती तथा मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव विनोद घोसाळकर यांनी काढले. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयात आयोजित समन्वय बैठकीला संबोधित करताना बोलत होते.

या बैठकीला ‘परिमंडळ – 2 चे उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक’ हर्षद काळे, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी व ‘पी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह मुंबई पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 विभागांचे आणि संबंधित खात्यांचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

पुढील वर्षापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर बंदी

पुढील वर्षाच्या श्री गणेशोत्सवापासून म्हणजेच सन 2023 च्या श्री गणेशोत्सवापासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध असणार असून, शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्तींचीच खरेदी – विक्री करणे बंधनकारक असणार आहे, असे हर्षद काळे यांनी सांगितले.

मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमूद करणेही बंधनकारक

कोविड कालावधीनंतर होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून तयार करण्यात आलेल्या घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमूद करणेही बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणाऱ्यांना ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची श्री गणेश मूर्ती ओळखणे सुलभ होईल, असेही काळे यांनी बैठकीत सांगितले.

घरगुती गणेश मूर्ती उंचीची कमाल मर्यादा 2 फूट

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान घरगुती श्री गणेश मूर्तींची उंची ही 2 फुटांपेक्षा अधिक नसावी, तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसाठीच्या श्री गणेश मूर्तींची उंची ही शक्य तेवढी कमी असावी, असेही आवाहन काळे यांनी आजच्या बैठकी दरम्यान केले. त्याचबरोबर मंडप परवानग्या व महानगरपालिकेच्या स्तरावर दिल्या जाणाऱ्या अन्य परवानग्या या गेल्यावर्षी प्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी योजना राबविण्यात येत असून त्याद्वारे परवानग्या देण्यात येत आहे. या अनुषंगाने देखील उप आयुक्त काळे यांनी आजच्या बैठकी दरम्यान माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. तसेच अनुज्ञापन खात्याद्वारे आणि मुंबई अग्निशमन दलाद्वारे देण्यात येणाऱ्या परवानगी प्रक्रियेचाही त्यांनी आढावा घेतला. (Immerse of the plaster of Paris idols of Ganesha is mandatory in an artificial lake)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें