AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया आघाडीचा केंद्राला घाम फोडणारा निर्णय, आता थेट एल्गारच; उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या सीक्रेट मिटिंगमध्ये काय ठरलं?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मतदानात गोंधळ घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत झालेली बैठक आणि राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र चर्चा यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीचा केंद्राला घाम फोडणारा निर्णय, आता थेट एल्गारच; उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या सीक्रेट मिटिंगमध्ये काय ठरलं?
उद्धव ठाकरे-राहुल गांधीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 09, 2025 | 10:43 AM
Share

निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वीच केला होता. पत्रकार परिषद घेत त्यांनी मोठा बॉम्ब टाकला असून हा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. गेल्या आठवड्यात इंडिया आघाडीचीही बैठक दिल्लीत पार पडली. राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र बैठक होऊनही चर्चा झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाविरोधातील लढा तीव्र करण्याच निर्णय घेण्यात आला असून अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे सोमवार, 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघआडीतर्फे निवडणूक आयोगविरोधात मोर्चा काढत एल्गार पुकारण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आज माध्यमांशी संवाद साधताना या विषायवर बोलत बरेच खुलासे केले. उद्धव ठाकरे व राहुल गांधींच्या बैठकीत नेमकं काय घडलं, काय ठरलं, हेही त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरोधात लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांच्या भेटीत ठरल्याचं राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळा बाहेर काढण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतील जी चीप आहे, ती डिस्टर्ब झाली आहे. आमची डोक्यातील चीप बरोबर आहे. 11 तारखेला निवडणूक आयोगवर सर्वपक्षीयं मोर्चा (इंडिया ब्लॉक) हे काढण्याचं नक्की झालं आहे. आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होतील. सगळ्याच पक्षांचे खासदार, प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलं आहे, असं राऊत म्हणाले.

35 मिनिटांच्या बैठकीत काय झाली चर्चा ?

उद्धव ठाकरे हे तीन दिवनस दिल्लीत मुक्कामी होते, त्यांना राहुल गांधींनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे आले, राहुल गांधींनी निवासस्थानी, स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातील स्पेशल प्रेझेंटेशन दाखवलं तिथे.  आम्ही ते नीट पाहिलं, समजून घेतलं.  त्यानंतर भोजन व नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी मोजक्या लोकांची एक बैठक झाली. त्यावेळेस राहुल गांधी, खर्गे,  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, इतर प्रमुख नेते उपस्थित होतो. त्या बैठकीत राजकारणाची पुढील रूपरेषा ठरली, अनेक विषयांवर चर्चा झाली, असं राऊत म्हणाले.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?