AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील..

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. आजही पावसाचा ऑंरेज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला.

पाऊस थांबेना, शेतकरी राजा चिंतेत, आजही 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा थेट इशारा, पुढील..
Maharashtra Rain
| Updated on: Apr 02, 2026 | 7:25 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील काही भागात आज गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाला पोषक हवामान राज्यात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज गारपिट आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतर भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. उष्णता देखील काही भागात वाढण्याचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सतत हवामानात बदल होत आहे.

मार्च महिना संपून एप्रिल महिन्याला सुरूवात झाली. मात्र, तरीही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. या अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी केली जात आहे.

धाराशिव जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा अवकाळी पाऊस झाला. धाराशिव, कळंब तालुका वाशी तालुका व तुळजापूर तालुका या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून या पावसानं द्राक्ष आंबा, केळी या फळ पिकासह ज्वारी व काढणीला आलेला गहू देखील मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा-वीस दिवसाच्या कालावधीत सातत्याने अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि वाशिम तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊससह काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे शेतातील बिजवाई कांदा, गहू आणि ज्वारी पिकांसह आंबा बागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. वाऱ्याच्या वेगामुळे पिके आडवी पडण्याचा धोका निर्माण झाला असून, काढणीच्या टप्प्यातील पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

Follow Us
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?